आई-वडील व गुरुंच्या संस्कारांच्या शिदोरीवर मुलांचे करिअर घडते – आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड
नूतन केंद्रप्रमुख सत्यवान थोरात व पशुधन विकास अधिकारी डॉ. ओंकार थोरात यांचा सत्कार
माढा (बारामती झटका)
आजच्या आधुनिक तंत्रज्ञान व माहितीच्या युगातही आई-वडील व गुरुंचे संस्कार, शिस्त, ज्ञान व अनुभवाची शिदोरी खूपच महत्त्वाची आहे. जर आई-वडील व गुरुंनी मुलांना अचूक मार्गदर्शन केले, वेळोवेळी त्यांना त्यांच्या चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. वाईट संगतीमुळे वर्तन बिघडत असल्यास कान उघडणी केल्यास तसेच त्यांच्या चांगल्या गोष्टींचेही कौतुक करुन शाबासकीची थाप दिल्यास मुलांचे करिअर नक्कीच घडते, असे प्रतिपादन विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांनी केले आहे.
ते अंजनगाव (खे.) शाळेचे मुख्याध्यापक श्री. सत्यवान थोरात यांची केंद्रप्रमुखपदी व देवडीचे डॉ. ओंकार थोरात यांची एमपीएससी परीक्षेतून पशुधन विकास अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल यशस्वी पितापुत्राच्या सत्काराच्या वेळी बोलत होते.
यावेळी विठ्ठलवाडी येथील समस्त गुंड परिवाराच्यावतीने नूतन केंद्रप्रमुख सत्यवान थोरात व पशुधन विकास अधिकारी डॉ. ओंकार थोरात यांचा सत्कार सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड व आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नूतन केंद्रप्रमुख सत्यवान थोरात यांनी सांगितले की, स्वतःच्या मुलांबरोबरच जेव्हा आपल्या हाताखाली शिक्षण घेतलेले विद्यार्थी गुणवत्तेच्या जोरावर उच्च पदावर विराजमान होतात, तेव्हा शिक्षकांना खरा आनंद व आत्मिक समाधान लाभते. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आपापले काम प्रामाणिकपणे बजावले तर भावी पिढी ज्ञानाने सक्षम व स्वावलंबी बनण्यास मदत होईल.
सत्काराला उत्तर देताना नूतन पशुधन विकास अधिकारी डॉ. ओंकार थोरात यांनी सांगितले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही चांगले गुण व क्षमता असणे गरजेचे असते. त्यांच्या जोडीलाच प्रामाणिक कष्ट, जिद्द, चिकाटी हवी. ध्येय प्राप्तीसाठी नुसती इच्छाशक्ती असून चालत नाही तर त्यास कृतीची जोड दिली तरच कोणत्याही क्षेत्रात अपेक्षित यश संपादित करता येते.
यावेळी शांताबाई गुंड, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, विठ्ठलराव शिंदे पतसंस्थेचे संचालक सुधीर गुंड, सहशिक्षिका माधुरी वागज, सुरेखा थोरात, मेघना गुंड, शिवम गुंड, मेघश्री गुंड, समृद्धी गुंड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..
Very well written! The insights provided are very valuable. For additional information, check out: LEARN MORE. Looking forward to the discussion!