ताज्या बातम्यासामाजिक

आई-वडिलांच्या संस्काराच्या शिदोरीवर स्वकर्तुत्वाने गगनभरारी घेऊन आपली आर्थिक उन्नती केली…

माळशिरस (बारामती झटका)

समाजामध्ये सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांची चर्चा फार होत नाही मात्र, प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊन आई-वडिलांच्या संस्काराच्या शिदोरीवर स्वकर्तृत्वाने गगनभरारी घेऊन आपली आर्थिक उन्नती केलेल्या कर्तृत्ववान तरुणाची अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त खडतर जीवन प्रवासाची यशोगाथा समाजातील तरुणांना प्रेरणा देणारी आहे..

माळशिरस शहरात सौ. राधाबाई व श्री. बाळासाहेब धाईंजे सर्वसामान्य व सुसंस्कृत कुटुंब त्यांना रमेश व दिनेश अशी राम लक्ष्मणासारखी असणारी दोन मुले आहेत. घरची प्रतिकूल परिस्थिती बेताची. आर्थिक संस्कार लहानपणीच. रमेश व दिनेश यांनी मनाशी खुणगाठ बांधली. आपण आपली आर्थिक परिस्थिती आई-वडिलांच्या संस्काराच्या शिदोरीवर स्वकर्तृत्वाने गगन भरारी घेऊन आर्थिक उन्नती करू शकतो, अशी मनाशी लहानपणीच ठरवलेले होते.

दिनेशने राजकारणाबरोबर स्वतःचे अर्थकारण करून समाजामध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. दिनेश यांनीही आपली पदवी संपादन करून एलएलबी शिक्षण पूर्ण केली आहे. दिनेश यांनी रियल इस्टेट मध्ये लक्ष देऊन काम केले. त्यांना मित्रपरिवार यांची मोलाची साथ मिळाली.

दिनेश लहानपणापासून चुनचुनित व हुशार मुलगा. बोलण्यामध्ये पटाईत, शब्दांवर प्रभुत्व असलेला दिनेश रियल इस्टेट मध्ये पारंगत झाला. जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार अतिशय चोखपणे पार पाडत असत. आर्थिक परिस्थितीवर मात करत दिनेश यांनी आपली उन्नती करून घेतलेली आहे. व दिनेश यांच्याकडे काहीही नव्हते. मात्र स्वकर्तुत्वाने आज रिअल इस्टेटच्या माध्यमातून अनेक ठिकाणी इस्टेट निर्माण केली आहे. माळशिरस शहरासारख्या गावांमध्ये प्लॉट घेऊन बंगला उभा केलेला आहे.

दिवसेंदिवस दिनेश यांचा लोकांशी सुसंवाद व व्यवहारिक नातेसंबंध जोडले गेले. रिअल इस्टेट मध्ये दिनेश यांनी आपले नाव केलेले आहे. मित्रपरिवार व नातेवाईक यांच्यामध्ये स्नेह वाढावा यासाठी दिनेश यांचा वाढदिवस 5 जुलै रोजी नालंदा बुद्ध विहार माळशिरस येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. त्यानंतर अक्षता मंगल कार्यालय येथे स्नेह भोजनाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे दिनेश धाईंजे मित्रपरिवार यांच्यावतीने अभिष्टचिंतन व स्नेहभोजनास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button