आरोग्यदूत माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शासकीय योजना व दस्तऐवज शिबिराचे अकलूज येथे आयोजन

भाजपा युवा मोर्चाचे अकलूज शहराध्यक्ष, मैत्री फाउंडेशन सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक महेश शिंदे यांच्या वतीने आयोजन
अकलूज (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शासकीय योजना व दस्तऐवज शिबिराचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे अकलूज शहराध्यक्ष, मैत्री फाऊंडेशन सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक महेश केशव शिंदे यांच्या वतीने बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते ५ पर्यंत अंगणवाडी नवीन बाजार तळ, अकलूज येथे करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रेशन कार्ड (नवीन/दुरुस्ती), श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, बाल संगोपन योजना, आधार कार्ड अपडेट, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, लाडकी बहीण योजना अशा सेवा उपलब्ध असणार आहे.
शिबिरामध्ये उपलब्ध सेवा व लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे…
1️⃣नवीन रेशन कार्ड / दुरुस्ती / नाव वाढवणे – कमी करणे
नवीन रेशन कार्ड साठी :
- कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड
- सर्व कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड
- रहिवासी पुरावा (वीज बिल / घरपट्टी)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
नाव वाढवण्यासाठी : - रेशन कार्ड झेरॉक्स
- संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड
- जन्म दाखला (मुलासाठी)
- विवाह दाखला (लग्नानंतर नाव वाढवण्यासाठी)
नाव कमी करण्यासाठी : - रेशन कार्ड झेरॉक्स
- मृत्यू दाखला (मृत्यू झाल्यास)
- स्थलांतर / विवाह दाखला
2️⃣ श्रावणबाळ योजना - आधार कार्ड
- वयाचा पुरावा
- उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
3️⃣ संजय गांधी निराधार योजना - आधार कार्ड
- उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
4️⃣ बाल संगोपन योजना - मुलाचा जन्म दाखला
- पालकांचे आधार कार्ड
- उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
5️⃣ आधार कार्ड अपडेट - आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- आवश्यक असल्यास पत्ता / ओळख पुरावा
6️⃣ पॅन कार्ड - आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
7️⃣ मतदान ओळखपत्र - आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- पासपोर्ट फोटो
8️⃣ लाडकी बहीण योजना - आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो

सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी 8999060041 / 9146427047 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेआहे.
तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक भाजपा युवा मोर्चाचे अकलूज शहराध्यक्ष, मैत्री फाऊंडेशन सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक महेश केशव शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



