आवाजाचा जादूगार ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील, बुलढाणा यांचे मेडद येथे सुश्राव्य कीर्तन होणार…

मेडद गावचे प्रगतशील बागायतदार स्वर्गीय विश्वनाथ बहिरू लवटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, महाप्रसादाचे आयोजन.
मेडद (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील मेडद गावचे प्रगतशील बागायतदार स्वर्गीय विश्वनाथ बहिरू लवटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त गुरुवार दि. 09/04/2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये लवटेवस्ती, मेडद, ता. माळशिरस येथे आवाजाचा जादूगार ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील, बुलढाणा यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे श्री. विनायक विश्वनाथ लवटे, श्री. दत्तात्रय विश्वनाथ लवटे, सौ. रंजना बापूराव सुळ आणि समस्त लवटे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

आमचे पिताश्री यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी मित्रपरिवार नातेवाईक यांनी उपस्थित राहावे. कार्यक्रमाच्या घाई गडबडीत आपणांस निमंत्रण मिळाले नसल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे मुंबई मंत्रालय सचिव श्री. विनायक लवटे साहेब यांच्यावतीने वेळेवर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



