ताज्या बातम्यासामाजिक

ऐकावे ते नवलच… चांदापुरी येथे ‘चट मंगनी पट शादीचा झटका’

चांदापुरी (बारामती झटका)

आजकाल लग्न ही अतिशय गुंतागुंतीची समस्या झाली आहे. मुलगा-मुलगी पाहणे, प्रत्यक्षात लग्न पार पडणे, यामध्ये कितीतरी टप्पे असतात. यात येणारी विघ्ने ही वधु-वर कक्षांची दमवणुक करणारी असतात. पण कधी-कधी अचानक ”चट मंगनी, पट शादी” चा सुखद अनुभव येतो आणि समाजमन हरखुन जाते. अशीच एक घटना माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे घडली आहे.

चांदापुरी येथील श्री. अजिनाथ मसु कवळे यांची सुकन्या चि.सौ.कां. प्रतिभा (बी. ए. ) हिला बघण्यासाठी मंगळवार दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी रा. जाकापुर, जि. सांगली येथील पाहुणे आले. मुलगा उच्चशिक्षीत होता आणि कवळे घराणेही प्रागतिक विचाराचे होते. दुपारी मुलगी पसंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर गावातील उपस्थित मान्यवरांनी लग्न आजच करायचे, असा निर्णय घेतला. वधु-वर कक्षांनी यास त्वरीत मान्यता दिली. श्री. अजिनाथ मसु कवळे रा. चांदापुरी, ता. माळशिरस, जि. सोलापुर यांची कन्या वधु चि.सौ.कां. प्रतिभा (बी.ए. ) व श्री. संजर रंगाराव साठे रा. जाकापुर, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली, यांचे जेष्ठ चिरंजीव निलेश (मेकॅनिकल इंजिनीयर) यांचा शुभविवाह मंगळवार दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी ठिक 6 वाजता मोठ्या थाटामाटात पार पडला आणि वऱ्हाड सायंकाळी वधुला घेवुन सांगलीला रवाना झाले.

या विवाहाप्रसंगी चांदापुरीचे लोकनियुक्त सरपंच जयवंत आण्णा सुळ, उपसरपंच तात्यासाहेब चोरमले, पार्टीप्रमुख विजयदादा पाटील, युवानेते शाहिद शेख, रमेश सुळ, हणमंत लोखंडे, हणमंत मिसाळ, मुनीर शेख, पठाणवस्तीचे ग्रा. पं. सदस्य अशोक सोनवणे, माजी सरपंच महिबुब पठाण, चांदापुरी सोसायटीचे चेअरमन तनवीर पठाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button