अकलुज गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी…

अकलूज (बारामती झटका)
फिर्यादी रा. वायफळ, ता. जत जि. सांगली हे दिनांक ०३/०६/२०२६ रोजी अकलुज येथील हॉटेलमधुन जेवण करुन एस. टी. स्टैंडकडे चालत जात असताना दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवरुन येवून फिर्यादीस कोठे जायचे आहे असे विचारले. त्यावर फिर्यादीने एस. टी. स्टैंडकडे जात असल्याचे सांगितल्याने सदर इसमांनी चला आमचे गाडीवर बसा तुम्ही. एस. टी. स्टँडवर सोडतो असे म्हणून त्यांचे मोटार सायकलवर बसवून दुचाकी एस. टी. स्टैंडकडे न नेता तांबोळी वसाहत, गिरमेवस्ती येथील निर्जन ठिकाणी नेवून फिर्यादीस काठीने मारहाण करुन त्यांचे खिशातील ९९, ३५०/- रुपये रोख रक्कम जबरी चोरी करून नेल्यावरुन अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं. ४०३/२०२६ बी.एन.एस.क. ३०९ (६), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रीक माहिती व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने अनोळखी दोन इसमांचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) सुनिल भिमराव भिंगारदिवे रा. राऊतनगर, अकलुज, माळशिरस, २) आजिनाथ नागनाथ गिरी, ३) संतोष महादेव गायकवाड दोघे रा. सराटी ता. इंदापूर जि. पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामध्ये आरोपी १) सुनिल भिमराव भिंगारदिवे रा. राऊतनगर, अकलुज, माळशिरस याचे सांगणेवरुन आरोपी २) आजिनाथ नागनाथ गिरी, ३) संतोष महादेव गायकवाड दोघे रा. सराटी ता. इंदापूर जि. पुणे यांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींकडून त्यांनी जबरी चोरीमध्ये चोरी केलेली ९९,३५०/- रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम हे करीत आहेत.
तसेच अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं. ३६३/२०२६ बी.एन.एस. क. ३०४ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये अकलुज नवीन बस स्थानक येथुन टेंभुर्णीकडे जाणारे बसमध्ये प्रवाशी चढत असताना फिर्यादीचे गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अज्ञात इसमाने चोरुन नेल्यावरुन गुन्हा दाखल होता. त्यामध्ये अकलुज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रीक माहिती व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने अज्ञात इसमाचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) सुधीर रावसाहेब कराळे रा. धामनगांव देवी ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर, २) शुभम गोरक्ष चव्हाण रा. इंदिरानगर, पाथर्डी, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करुन त्यांचेकडून गुन्ह्यातील माल फिर्यादीचे गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन एकुण ९४,०००/- रुपयेची असा १०० टक्के हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवा. शिवकुमार मदभावी हे करीत आहेत.
तसेच अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं. ३५४/२०२६ बी.एन.एस.क. ३०४, ३(५) प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी रा. माळखांबी ता. माळशिरस या शेतातुन जनावरांसाठी चारा डोक्यावरुन घेवून जात असताना अनोळखी दोन इसमांनी त्यांचेजवळ येवून पत्ता विचारण्याचे बहान्याने फिर्यादीचे गळयातील ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेला पत्ता हिसका देवून चोरुन नेलेवरुन गुन्हा दाखल होता. त्यामध्ये अकलुज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रीक माहिती व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने अनोळखी दोन इसमाचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) बालाजी हनुमंत पवार रा. पवारवस्ती, खेडभोसे ता. पंढरपूर, २) पंडीत सुभाष होळकर रा. व्होळे, ता. पंढरपूर यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करुन त्यांचेकडून गुन्ह्यातील माल फिर्यादीचे गळ्यातील ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेला पत्ता व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल बजाज पल्सर असा १०० टक्के हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवा. राहुल रणनवरे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग अकलुज संतोष वाळके, पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पो. हवा. शिवकुमार मदभावी, विक्रम घाटगे, विनोद साठे, सुहास क्षिरसागर, राहुल रणनवरे, विशाल पोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय खरात, पंडीत गवळे, प्रविण काळे यांनी कामगिरी केली आहे. तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रविण मेटकरी, राहुल सोनकर यांचे सहकार्य केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



