दिव्यांग व्यक्तीने स्मशान भूमीत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला…

जांबूड (बारामती झटका)
मौजे माळेवाडी (जांबूड), ता. माळशिरस गावातील दिव्यांग व्यक्ती श्री. नितीन शांताराम पोखरे हे अंध व्यक्ती असून यांनी आपल्या गावातील स्मशान भूमीमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यामध्ये वडाची पाच झाडे लावण्यात आली. यानिमित्ताने सरपंच श्री. राहुल खटके, मा. डेप्युटी सरपंच श्री. पांडुरंग हुंबे, श्री. हरिदास नलवडे, युवा नेते सुरज शिंदे, सार्थक पराडे, महेश खटके, हर्षल हुंबे, पांडुरंग गुळुमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

केक, आतिषबाजी, गिफ्ट्स, पार्टी अशा अनावश्यक गोष्टींना फाटा देत दिव्यांग व्यक्ती श्री. नितीन शांताराम पोखरे यांनी वृक्षारोपण केले आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. वृक्षांची संख्या कमी होत चालल्याने तापमान वाढते आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून श्री. नितीन पोखरे यांनी अशा वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



