बंधुतुल्य राजेंद्र (बॉस) दादासाहेब पांढरे यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मान केला…

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा, निष्ठा आणि कर्तव्य, निस्सीम श्रद्धा आणि भक्ती, विश्वास आणि वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तीमंत प्रतीक…
नातेपुते (बारामती झटका)
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तीमंत प्रतीक, आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेकजण वंदन करीत असतात. असेच नातेपुते, ता. माळशिरस येथील पांढरे इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे सर्वेसर्वा तथा भारतीय जनता पार्टीचे नातेपुते शहर अध्यक्ष गुरु बंधुतुल्य राजेंद्र (बॉस) दादासाहेब पांढरे यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी यशस्वी युवा उद्योजक अमोलशेठ यादव, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नातेपुते मंडल अध्यक्ष युवा नेते सुनील गोरे, बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल संपादक संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी गुरुबंधू या नात्याने सन्मान केला…
नातेपुते येथील श्री. दादासाहेब काशिनाथ पांढरे सर्वसामान्य व शेतकरी व्यवसाय असणारे. त्यांना राजेंद्र व विजय अशी दोन मुले आहेत. नातेपुते शहराचे व्यापारी दृष्टिकोनातून माळशिरस तालुक्यातच नव्हे तर सोलापूर, सातारा, सांगली, पुणे व इतर जिल्ह्यात नाव आहे. यामुळे राजेंद्र व विजय यांनी शिक्षणापेक्षा उद्योग व्यवसायाकडे लक्ष दिले. व्यवहार ज्ञानापुरते शिक्षण घेऊन राजेंद्र व विजय या राम-लक्ष्मणाच्या जोडीने २००२ साली पांढरे इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स दहिगाव रोड, नातेपुते येथे व्यवसायास सुरुवात केली. सुरुवातीस टीव्ही, रेडिओ, व्हिसीआर, सिडीकॅसेट अशा वस्तुंसह वायर, बल्ब, पंखे, इस्त्री अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीस सुरुवात केली. दिवसेंदिवस उद्योग व्यवसायामध्ये वाढ होत गेली.
दोन्ही बंधूंनी व्यवसाय करीत असताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून व्यवसाय केला. अगोदरच व्यापार क्षेत्रामध्ये नातेपुते गावाचे नाव होते. पांढरे इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाने स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण करून नातेपुते नगरीच्या उद्योग व्यवसायाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नातेपुते येथील पांढरे इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची नेहमी वर्दळ असते. मालाची गॅरंटी आणि किफायतशीर किंमत या दोन्हीचा ताळमेळ ठेवलेला आहे. नफा कमी मात्र, विक्री ज्यादा हे सूत्र अवलंबलेले असल्याने दिवसेंदिवस व्यवसाय वाढत गेला. उद्योग व्यवसायामध्ये वडिलांच्या आशीर्वादाने राजेंद्र आणि विजय या राम लक्ष्मणाच्या जोडीने आपली स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. पूर्वीच्या व्यवसायापेक्षा कितीतरी पटीने व्यवसाय वाढलेला असल्याने ग्राहकांना खरेदी करताना अडचण येऊ नये, यासाठी दोन दशकानंतर दुकानाचे नूतनीकरण करून भव्य शोरूमसारखे दुकान उभारलेले आहे. राजेंद्र बॉस यांना पत्नी, मुलगा व मुलगी यांचीही चांगल्या प्रकारे साथ असते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



