ताज्या बातम्यासामाजिक

बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील धुरंदर पुरस्काराने सन्मानित…

अकलूज (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते, हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार व अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांना साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतमजी भंडारे यांनी धुरंदर पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…

माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील आई श्री रिसॉर्टमध्ये साप्ताहिक बंडखोरच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त धुरंधर पुरस्कार सोहळा व धुरंधर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार रामभाऊ सातपुते, डॉक्टर एम. के. इनामदार, डॉक्टर श्रद्धा जवंजाळ, आरपीआय (आठवले) युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे, जिल्हा दक्षता व नियंत्रण समन्वय समितीचे सदस्य विनोद रणदिवे, भाजपाचे अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे, डॉ. अक्षय वाईकर, नगरसेवक महेश शिंदे, नगरसेवक राहुल लोंढे यांच्यासह पुण्याहून आलेले सारंग मोकाटे, कार्यकारी संपादक राजरत्न गौतम भंडारे, उपसंपादक ज्योती गायकवाड-लोंढे, पुरस्कारार्थी व साप्ताहिक बंडखोरवर प्रेम करणारे वाचक, हितचिंतक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर गायकवाड यांनी केलेले होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button