पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात हेलिकॉप्टरने अकलूज येथे दौरा जाहीर..

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा सातारा, सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात झंजावाती दौरा कार्यक्रम जाहीर.
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा शनिवार दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी सातारा, सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात झंजावाती दौरा कार्यक्रम ठरला आहे. पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या भाजप व महायुतीच्या प्रचार व जाहीर सभेसाठी विजय चौक येथे उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे शनिवार दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी कमलकुंज निवासस्थान बोराटवाडी, ता. माण येथून मोटारीने आंधळी धरण हेलिपॅड वरून वासुद, ता. सांगोला कडे रवाना होतील. वासुद येथून मोटार येणे, सांगोला येथे भाजप पदाधिकारी यांचे समवेत बैठकीस उपस्थित राहून सांगोला नगरपरिषद निवडणूक प्रचार शुभारंभास उपस्थित राहणार आहेत. सांगोला वरून मोटारीने जाऊन वासुद येथून हेलिकॉप्टरने तुळजापूर येथील हेलिपॅड वर आगमन होऊन मोटारीने मुद्गुलेकर महादेव मंदिर तुळजापूरकडे प्रयाण करतील. मुद्गुलेकर मंदिर येथे आगमन. चिरंजीव मल्हार व चि. सौ. कां. साक्षी यांचे विवाह समारंभास उपस्थित राहून तुळजापूर येथून हेलिकॉप्टरने माळीनगर, ता. माळशिरस येथे रवाना होणार आहेत. माळीनगर येथून मोटारीने अकलूज, ता. माळशिरस येथे अकलूज नगर परिषद निवडणूक प्रचार शुभारंभ व जाहीर सभेस विजय चौक येथे उपस्थित राहणार आहेत. अकलूज येथून सोयीनुसार मोटार येणे बोराटवाडी, ता माण येथील कमलकुंज निवासस्थानी रवाना होणार आहेत.
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक आदर्श आचार संहितेच्या अधीन राहून सदरचा कार्यक्रम स्वीय सहाय्यक श्री. सूर्यकांत सजगणे यांनी मंत्री महोदय यांचा कार्यक्रम दौरा जाहीर केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



