भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण उपाध्यक्षपदी नागेश वाळुंजकर यांची नियुक्ती…

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते नियुक्तीचे पत्र प्रदान…
करमाळा (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सोलापूर पश्चिम ग्रामीण उपाध्यक्षपदी नागेश वाळुंजकर यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष गणेशजी चिवटे, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, युवा नेते प्रिन्सभैय्या बागल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते..

सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेवर स्थापनेपासून पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे. ग्रामीण भागामध्ये नगरपरिषद, नगरपंचायत व पंचायत समिती या ठिकाणीही भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य आहे. भारतीय जनता पार्टीचे तळागाळात काम वाढविण्याकरता ग्रामीण भागातील सक्षम युवकांच्या निवडी केल्या जात आहेत. सोलापूर पश्चिम ग्रामीण उपाध्यक्ष पदाची जबाबदारी नागेश वाळुंजकर यांच्यावर देण्यात आलेली आहे.

वाळुंजकर यांचं तरुणांचं संघटन, काम करण्याचे कौशल्य नेहमी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडीत असतात. लोकांच्या कायम संपर्कामध्ये राहून समाजामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारे नागेश वाळुंजकर यांच्यावर भारतीय जनता पार्टीने उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे गावागावात, वाड्या वस्तीवर पोहोचवतील, असा विश्वास वाळुंजकर मित्रपरिवार यांच्यामधून येत आहे. निश्चितपणे वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील असाही विश्वास व्यक्त केला जात आहे..


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



