फलटण शहर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या माध्यमातून शहरातील प्रभाग पाहणी दौरा

फलटण (बारामती झटका)
कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या माध्यमातून एकत्र फलटण शहरातील प्रभागांचा पाहणी दौरा आजपासून सुरू करण्यात आला आहे.

मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी नुकतेच प्रत्येक प्रभागासाठी 50 लाख रूपये व नविन नाट्यगृहासाठी 8 कोटी रूपये मंजुर केले आहेत. यातील प्रत्येक प्रभागासाठी दिलेले 50 लाख रुपयांचे प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी जसे की गटर, पिण्याची पाईप लाईन व बोळांचे काँक्रीटीकरण करणे यासाठी खर्च करावयाचे आहेत, अशा सूचना माजी खासदार व आमदार यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे आज सोमवार पेठ प्रभाग क्रमांक एक मधून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली आहे.
त्यावेळी दौऱ्यात गटनेते अशोकराव जाधव, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, रणजितबाबा भोसले, नगरसेवक सचिन अहिवळे, फलटण शहर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राहूल निंबाळकर, देवा पाटिल, प्रसाद पाटील, संजय गायकवाड, उमेश पवार, आर. डी., अमित भोईटे, अमोल भोईटे, सनी मांढरे, राजू निंबाळकर, महेश घाडगे, अमोल घाडगे, संदीप घाडगे, सुनिल घोलप, संग्राम सावंत, रमेश जाधव, संदिप जाधव, लतिफभाई तांबोळी व भारतीय जनता पक्षाचे व राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.