Uncategorizedताज्या बातम्यासामाजिक

चालक आणि नोकरांच्या नावावर खरेदी केलेली मालमत्ता होणार जप्त – सर्वोच्च न्यायालय

मुंबई (बारामती झटका)

काळ्या देशातील पैशाविरुद्धच्या लढ्यात आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे मोठे बदल होणार असून हा निकाल एक मैलाचा दगड ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निकालात स्पष्ट केले आहे की, २०१६ पूर्वी झालेल्या बेनामी व्यवहारांच्या बाबतीत मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि आयकर विभागाला असेल. यामुळे आता बेनामी मालमत्तेच्या माध्यमातून कर चुकवणाऱ्या आणि अवैध संपत्ती लपवणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. तर ड्रायव्हर, नोकर, नातेवाईक अथवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांच्या नावे संपत्ती खरेदी केली असेल तर ती जप्त होऊ शकते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे काळा पैसा लपवणाऱ्यांना दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे काळा पैसा लपवणाऱ्यांना दणका बसला आहे. तर ज्यांनी आपल्या आर्थिक प्रभावाचा गैरवापर करून आपल्या ड्रायव्हर, स्वयंपाकी, घरगुती नोकर किंवा दूरच्या नातेवाईकांच्या नावावर जमीन, इमारती किंवा रोख गुंतवणूक केलीय अशांना थेट इशारा आहे. तर निर्णयामुळे तपास यंत्रणांना आता बळ मिळणार असून आयकर विभागाला दोन ते तीन दशकांपूर्वीच्या संशयास्पद प्रकरणांच्या फाईल्स पुन्हा उघडून तपास करण्यासाठी कायदेशीर आधार मिळाला आहे.

न्यायालयाने आपल्या आदेशात, स्पष्ट केले आहे की, सुधारित कायद्यानुसार नोव्हेंबर २०१६ पूर्वी नोंदवलेल्या प्रकरणांना सात वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा लागू होणार नाही. पण मालमत्ता जप्त करता येईल. जुन्या प्रकरणांमध्ये कमाल तीन वर्षांची शिक्षा कायम असेल. पण आर्थिक दंड आणि मालमत्ता जप्त अनिवार्य असेल.

यावेळी न्यायालयाने बेनामी मालमत्तांना कायदेशीर स्वरूप देण्यासाठी मृत्युपत्र आणि वारसा हक्काच्या कागदपत्रांच्या वापरावर देखील तीव्र चिंता व्यक्त केलीय. तसेच मूळ व्यवहार बेनामी असेल, तर मृत्युपत्राद्वारे त्याचे हस्तांतरण करणे बेकायदेशीर मानले जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये न्यायालय गप्प बसणार नाही.

हा ऐतिहासिक निर्णय मंजुळा आणि इतर विरुद्ध डी. ए. श्रीनिवास या खटल्याच्या सुनावणीदरम्यान देण्यात आला. या प्रकरणात, एका व्यक्तीने मृत्युपत्राच्या आधारे मालकी हक्काचा दावा केला होता. मात्र तपासाअंती जमीन सुधारणा कायद्यांपासून पळ काढण्यासाठी रचलेला हा कट असल्याचे उघड झाले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button