ताज्या बातम्याराजकारण

“चर्चा तर होणारच” माजी आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांची जनसामान्यात प्रतिमा उंचावत आहे

स्वकर्तृत्वाने राजकीय वाटचाल; लग्न-कार्य आणि सांत्वन भेटींमुळे ग्रामीण जनतेशी नाळ जोडली

अकलूज (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे माजी आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील जनसामान्यांशी थेट संवाद साधत आहेत. लग्न समारंभांना हजेरी, मृत्यू झाल्यानंतर सांत्वनपर भेटी आणि विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांशी वाढलेला जनसंपर्क यामुळे रणजीतदादांची प्रतिमा उंचावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

स्वकर्तृत्वाची ओळख निर्माण
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव अशी ओळख असलेले रणजीतसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर एक वेळा खासदार आणि विधान परिषदेवर दोन वेळा आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदही भूषवले.

मात्र, यापूर्वी त्यांचा ग्रामीण भागातील जनतेशी थेट संपर्क कमी होता. त्यामुळे “रणजीतसिंह हवेत असतात” अशी चर्चा गावागावात होती.

गेल्या काही महिन्यांपासून मात्र चित्र बदलले आहे. रणजीत दादा यांनी स्वकर्तृत्वाने राजकीय वाटचाल सुरू केली असून आपले स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. सुख-दुःखात सहभागी होत ते थेट नागरिकांच्या भेटी घेत आहेत.

समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण
तालुक्यातील लग्नकार्य, सांत्वनपर भेटी आणि विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी ग्रामीण जनतेशी थेट नाळ जोडली आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, रणजीतदादांच्या या नव्या शैलीमुळे माळशिरस, सोलापूर पट्ट्यातील राजकीय समीकरणे येणाऱ्या काळात बदलू शकतात.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button