सदाशिवनगर गावच्या उपसरपंच श्रीमती सुमन नारायण भोसले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन….

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांना मातृशोक….
सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर, ता. माळशिरस गावच्या उपसरपंच श्रीमती सुमन नारायण भोसले यांचे वयाच्या 78 व्या वर्षी शुक्रवार दि. 20/08/2026 रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री. सोमनाथ भोसले व राजेंद्र भोसले यांच्या मातोश्री होत्या.
त्यांच्यावर आजच दुपारी एक वाजता सदाशिवनगर येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या दुःखद निधनाने भोसले परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. भोसले परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वराने बळ द्यावे व त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



