तरुण, धाडसी नेतृत्वाची काँग्रेसकडून दखल; ॲड. विठ्ठलराजे वाघमोडे पाटील यांची सोलापूर जिल्हा सचिवपदी निवड

माळशिरस (बारामती झटका)
तरुण वकील, धाडसी सामाजिक कार्यकर्ता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे ॲड. विठ्ठलराजे वाघमोडे पाटील यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अल्पावधीतच आपल्या अभ्यासू, आक्रमक आणि निर्भीड कार्यशैलीने त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना कोणाचीही भीडभाड न ठेवता प्रश्नाला थेट भिडण्याची त्यांची कार्यपद्धती ही त्यांच्या नेतृत्वाची विशेष ओळख बनली आहे.
कमी वयात मिळालेली ही जबाबदारी त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेणारी आहे. काँग्रेसची निवड ही केवळ पदासाठी नव्हे, तर विचार, संघर्ष आणि जनसेवेची वाटचाल करण्यासाठी असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते. पद, पैसा किंवा प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याची तयारी, हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद आहे.

तरुणाईला सोबत घेऊन सामान्य माणसाच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी ॲड. वाघमोडे पाटील निश्चितच प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ॲड. विठ्ठलराजे वाघमोडे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील सामाजिक, राजकीय आणि कायदेविषयक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



