चि. सागर रणनवरे माणकी व चि. सौ. कां. साक्षी गायकवाड, भांडगाव यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

पै. श्री. दत्तात्रय रावसाहेब मगर
सभापती, पंचायत समिती माळशिरस
महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती संघटना.
श्री. अनिकेत चांगदेव रणनवरे
रा. माणकी ता. माळशिरस.
माळशिरस (बारामती झटका)
स्व. जगन्नाथ तुकाराम रणनवरे यांचे नातू व सौ. सुरेखा व श्री. पुंडलिक जगन्नाथ रणनवरे रा. माणकी, ता. माळशिरस यांचे कनिष्ठ चि. सागर आणि स्व. अंकुश एकनाथ गायकवाड यांची नात व सौ. उज्वला व श्री. संतोष अंकुश गायकवाड रा. भांडगाव, ता. इंदापूर यांची सुकन्या चि. सौ. कां. साक्षी यांचा शाही शुभविवाह सोहळा मंगळवार दि. 18/08/2026 रोजी दुपारी 02 वाजून 21 मिनिटे या शुभमुहूर्तावर आनंदीगणेश मंगल कार्यालय, आनंदनगर, आनंदनगर-अकलूज रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे प्रेषक माळशिरस पंचायत समितीचे सभापती महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीगीर संघटना पै. श्री. दत्तात्रय रावसाहेब मगर, श्री. अनिकेत चांगदेव रणनवरे रा. माणकी, ता. माळशिरस यांच्या वतीने शुभकार्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शेषाच्या हाती धरतीची नाती, ज्ञानेश्वराने चालविल्या भिंती, अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी, होऊन गेले रती महारथी, प्रथम पुजावा श्री गणपती, धन्य ती भारतीय संस्कृती, ईश्वराच्या दैव हाती, शिंपल्यातून निघती मोती, तोच जुळवितो नाती सागर-साक्षी स्वागत करती, तरी नवदांपत्यास शुभ आशीर्वाद व सुमन अक्षदांचा वर्षाव करण्याकरता आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे आपले नम्र सौ. राजश्री व श्री. विठ्ठल जगन्नाथ रणनवरे, सौ. कौशल्य व श्री. नामदेव जगन्नाथ रणनवरे, सौ. सुरेखा व श्री. पुंडलिक जगन्नाथ रणनवरे, मा. मुख्याध्यापक सौ. मंदा व श्री. चांगदेव जगन्नाथ रणनवरे, आणि समस्त रणनवरे माणकी यांच्या वतीने शुभ कार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे रणनवरे, माणकी व गायकवाड, भांडगाव या दोन्हीही परिवारांच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



