चि. सौ. कां. कल्याणी सरगर, कण्हेर व चि. रोहित शेंडगे, रेडे यांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक
श्री. शिवदास आबा (दाजी) सरगर.
मा. उपसरपंच, कण्हेर, मंडप कॉन्ट्रॅक्टर.
श्री. हनुमंत महादेव सरगर.
श्री. बाळासाहेब महादेव सरगर.
अध्यक्ष, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माळशिरस तालुका…
कण्हेर (बारामती झटका)
सौ. रतनबाई व श्री. महादेव दाजी सरगर यांची नात व सौ. नीलिमा व श्री. संपत महादेव सरगर, रा. कण्हेर, ता. माळशिरस यांची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. कल्याणी आणि सौ. वैजयंता व श्री. पोपट दादू शेंडगे यांचे नातू व सौ. नीता व श्री. रामचंद्र पोपट शेंडगे, रा. रेडे, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. रोहित यांचा बुधवार दि. 26/08/2026 रोजी दुपारी 02 वाजून 15 मिनिटे या शुभमुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, ६१ फाटा, माळशिरस, ता. माळशिरस, येथे शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे कण्हेर गावचे माजी उपसरपंच मंडप कॉन्ट्रॅक्टर श्री. शिवदास (आबा) दाजी सरगर, श्री. हनुमंत महादेव सरगर, मुख्यमंत्री लडकी बहीण योजना माळशिरस तालुका अध्यक्ष श्री. बाळासाहेब महादेव सरगर व समस्त सरगर परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
प्रथम पुजावा श्री गणपती, धन्य ती भारतीय संस्कृती, ईश्वराच्या दैव हाती, शिंपल्यातून निघते मोती, तोच जुळवितो नाती-गोती, वधू वर पुष्पहारांनी स्वागत करती, वधू वरास शुभाशीर्वाद देण्यास यावे, असे आपले नम्र सौ. रतनबाई व श्री. महादेव दाजी सरगर, सौ. रुक्मिणी व श्री. शिवदास (आबा) दाजी सरगर आणि समस्त सरगर परिवार, कण्हेर यांच्या वतीने शुभकार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे सरगर परिवार, कण्हेर व शेंडगे परिवार, रेडे यांच्यावतीने शुभकार्यास उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



