चि. सौ. कां. प्रीती जाधव, मळोली आणि चि. श्रीकांत भोसले, अजनाळे यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

कै. राजेंद्र जाधव, मळोली आणि श्री. श्रीरंग भोसले, अजनाळे यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत जुळणार
मळोली (बारामती झटका)
कै. रामकृष्ण नारायण जाधव यांची नात व श्रीमती संध्या व कै. राजेंद्र रामकृष्ण जाधव रा. मळोली, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. प्रीती आणि कै. जनार्दन यशवंत भोसले यांचे नातू व श्री. श्रीरंग जनार्दन भोसले सर रा. अजनाळे, ता. सांगोला यांचे सुपुत्र चि. श्रीकांत यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. २८/०१/२०२४ रोजी सायंकाळी ४.१५ मि. या शुभमुहूर्तावर श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, दिघंची, मायणी रोड, ता. आटपाडी, जि. सांगली येथे संपन्न होणार आहे.
या शाही शुभविवाह सोहळ्यास आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधूवरांना अक्षतारूपी आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती निमंत्रक श्री. दीपक व्यंकटराव देशमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे.


लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याचे आवाहन जाधव व भोसले परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.