फोंडशिरस ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाचा मुहूर्त ठरला…

फोंडशिरस ग्रामपंचायतीचे १७ सदस्य देवदर्शनासाठी रवाना; माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे…
फोंडशिरस (बारामती झटका)
फोंडशिरस ग्रामपंचायतीचे सरपंच पोपटराव बोराटे व उपसरपंच दादासाहेब रणदिवे यांचेविरुद्ध ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ३५ अन्वये दि. ०५/०८/२०२४ रोजी श्री. कांतीलाल रामचंद्र देवकर व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी अविश्वास ठराव तहसीलदार, माळशिरस यांच्याकडे दाखल केलेला होता. सदरच्या ठरावाच्या नोटिशीवरून फोंडशिरस ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठरावाबाबत विशेष सभा दि. ०९/०८/२०२४ रोजी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कार्यालय फोंडशिरस, ता. माळशिरस येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदरच्या सभेस उपस्थित राहण्यासाठी सदस्यांना नोटीसा काढण्यात आलेल्या आहेत.
फोंडशिरस ग्रामपंचायतीचे देवकर कांतीलाल रामचंद्र, गोरे प्रदीप किसन, बोडरे रंजना लाला, बोराटे पोपट बाबा, काळे अनुसया हरी, शेंडे सुचिता परशुराम, मोटे भानुदास कृष्णा, धायगुडे सुशीला दत्तू, रणदिवे दादा शिवाजी, भोसले मंगल महादेव, वाघमोडे सिंधू पोपट, पाटील राजेंद्र मधुकर, बंडगर आप्पा बापू, वाघमोडे मनीषा राहुल, कुंभार हनुमंत पांडुरंग, ढोबळे रुक्मिणी हनुमंत, गोरे हेमलता सुनील असे १७ सदस्य आहेत.

अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच व सदस्य देवदर्शनाच्या टूरवर गेलेले आहेत. अविश्वास ठराव मंजूर होण्याकरिता १३ सदस्य यांनी ठरावाच्या बाजूने मतदान देणे गरजेचे आहे. सध्या तरी सर्वच्या सर्व सदस्य देवदर्शनाच्या टूरवर आहेत. कोणाबरोबर किती सदस्य आहेत, याचा अंदाज नाही मात्र, अविश्वास ठरावाच्या दिवशी सर्व काही राजकीय घडामोडी समोर येणार आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्याचे सरपंच व उपसरपंच यांच्या अविश्वास ठरावाकडे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.