चोपडज येथे ग्रामीण कृषी कार्यानुभवांतर्गत पी.आर.ए. (PRA) उपक्रमाचे आयोजन

बारामती (बारामती झटका)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील कृषी विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत चोपडज (ता. बारामती) येथे सहभागी ग्रामीण मूल्यांकन (PRA) उपक्रम राबविला.
या उपक्रमात ग्रामस्थ व शेतकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गावातील नैसर्गिक साधनसंपत्ती, उपलब्ध सुविधा, शेतीची स्थिती, सामाजिक व आर्थिक परिस्थिती तसेच विकासाच्या गरजांविषयी माहिती संकलित करण्यात आली. तसेच ग्रामस्थांची मते व सूचना जाणून घेऊन भविष्यातील विकासासाठी उपयुक्त माहिती गोळा करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी रंगोळीच्या माध्यमातून चोपडज गावाचा नकाशा तयार करून त्यामध्ये ग्रामपंचायत, शाळा, मंदिर, दूध डेअरी, कृषी सेवा केंद्र, पतसंस्था तसेच गावातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांचे दर्शन घडविले. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
यज्ञेश पाडवी, अनंतरूप माने, उदय दुडे, ओम पाटे, अपूर्व चव्हाण, राजवर्धन चौधरी आणि सूरज निंभोरे आदी कृषी विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



