Uncategorized

दशरथ पवार यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती…

माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नियुक्तीचे पत्र दिले.

इंदापूर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम माजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी हगारेवाडी येथील युवा नेते श्री. दशरथ साहेबराव पवार यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इंदापूर तालुका राष्ट्रवादी भटक्या विमुक्त जाती जमाती सेल अध्यक्षपदी नियुक्ती पत्र प्रदीप गारटकर यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी आमदार दत्ता मामा भरणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री‌. दशरथ साहेबराव पवार यांना दिलेल्या नियुक्ती पत्रामध्ये, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इंदापूर तालुका राष्ट्रवादी भटक्या विमुक्त जाती जमाती सेल अध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन..

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, आचारविचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहाल, असा मला विश्वास आहे, असे पत्र जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर यांनी श्री‌. दशरथ साहेबराव पवार, रा. हागारेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button