डाॅ. मनिष गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांना वृक्षरोपांची अनोखी भेट.

अकलूज (बारामती झटका)
वाढदिवस म्हणजे केक कापणे आणि मिठाई वाटप ही पारंपारिक संकल्पना बाजूला ठेवत धनशैल्य शिक्षण संस्था अकलूजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनिष गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देत शाळेतील प्रत्येक मुलांना एक झाड देवून अनोखा वाढदिवस साजरा केला.

या कार्यक्रमात धनशैल्य शिक्षण संस्था व किडझी स्कूल अकलूजमध्ये शिक्षण घेणा-या लहान मुलांना व शिक्षकांना यावर्षी चॉकलेट, कॅडबरी किंवा केक ऐवजी करंज, वड, पिंपळ, जांभूळ, बकुळ यांसारख्या दाट सावली देणा-या वृक्षांची सुमारे ५०० रोपे भेट देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घराजवळ किंवा परिसरात हे रोप लावून त्याचे संगोपन करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.
“एक विद्यार्थी – एक वृक्ष” हा संदेश देत पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि हरित भविष्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत ही रोपे जतन करण्याचा संकल्प केला.

शाळेतील मुलांना लहान वयात झाडे लावण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. झाडांमुळे हवेतील ऑक्सिजन (प्राणवायू) चे प्रमाण वाढणार आहे. वृक्षारोपनामुळे सर्वांना शुध्द हवेचा श्वास घेता येईल. – डाॅ. मनिष गायकवाड, संस्थापक धनशैल्य शिक्षण संस्था अकलूज.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



