मळोली येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
श्री संत तुकोबाराय गाथा भजनाचा भव्य आणि दिव्य सोहळा होणार संपन्न
मळोली (बारामती झटका)
मळोली ता. माळशिरस येथे वै. ह. भ. प. श्रीगुरु मधुसूदन महाराज देहूकर व वै. ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज मळोलीकर यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ मळोली यांच्यावतीने रविवार दि. २३/४/२०२३ ते रविवार दि. ३०/४/२०२३ या कालावधीत विठ्ठल-रूक्मिणी मंदिर, मळोली येथे करण्यात आले आहे. या सप्ताहाचे यंदाचे ४७ वे वर्ष आहे. या हरिनाम सप्ताहामध्ये श्री संत तुकोबाराय गाथा भजन सोहळा भव्य आणि दिव्य स्वरूपात संपन्न होत आहे.
या सप्ताहामध्ये पहाटे ४ ते ६ काकड आरती, ६ ते ७ विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ९ ते १२ गाथा भजन, दुपारी १२ ते ४ भोजन व विश्रांती, सायंकाळी ४ ते ५.३० हरिपाठ, ६ ते ७ प्रवचन, ९ ते ११ कीर्तन व ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हरी जागर, असा दैनंदिन कार्यक्रम असणार आहे. या सप्ताहाचे नेतृत्व श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहूचे माजी अध्यक्ष ह. भ. प. श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर हे करणार आहे.
रविवार दि. २३/४/२०२३ रोजी ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज पवार मळोली यांचे प्रवचन होणार आहे तर, ह. भ. प. सोहम महाराज देहूकर (तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज) मळोली यांचे कीर्तन होणार आहे. या दिवशी दुपारचे अन्नदान नितीन जाधव तर संध्याकाळचे अन्नदान ह. भ. प. बापूसाहेब मधुसूदन देहूकर यांच्यावतीने असणार आहे. सोमवार दि. २४/४/२०२३ रोजी ह. भ. प. हरिहर नंदन रवी महाराज, पिलीव यांचे प्रवचन होणार आहे तर ह. भ. प. माऊली महाराज झोळ वाशिंबे ता. करमाळा यांचे कीर्तन होणार आहे. तसेच या दिवशी अल्पोपहार संजय पवार, दुपारचे अन्नदान विजय पाटील, संध्याकाळचे अन्नदान अशोक जाधव सर यांच्या वतीने असणार आहे. मंगळवार दि. २५/४/२०२३ रोजी ह. भ. प. प्रदीप महाराज ढेरे धानोरे यांचे प्रवचन होणार आहे तर ह. भ. प. माऊली महाराज पवार खेडभाळवणी यांचे कीर्तन होणार आहे. या दिवशी अल्पोपहार जयवंत पाटील, दुपारचे अन्नदान हनुमंत पवार आणि संध्याकाळचे अन्नदान उद्धव शिंदे यांच्यावतीने असणार आहे. बुधवार दि. २६/४/२०२३ रोजी ह. भ. प. श्रीमंत बापू महाराज जाधव मळोली यांचे प्रवचन होणार आहे तर ह. भ. प. हरिभाऊ शिंदे महाराज सोलापूर यांचे कीर्तन होणार आहे. या दिवशी अल्पोपहार राजन जाधव, दुपारचे अन्नदान आनंदराव जाधव आणि संध्याकाळचे अन्नदान मोरया अर्थमूव्हर्सचे दिलीप जाधव यांच्यावतीने असणार आहे. गुरुवार दि. २७/४/२०२३ रोजी ह. भ. प. केशव महाराज तोडकर सुरवड यांचे प्रवचन होणार आहे तर ह. भ. प. रामकृष्ण महाराज ठाकूर पंढरपूर यांचे कीर्तन होणार आहे. या दिवशी अल्पोपहार सुहास जाधव, दुपारचे अन्नदान मनोज जाधव तर संध्याकाळचे अन्नदान शंकरराव माने यांच्यावतीने असणार आहे. शुक्रवार दि. २८/४/२०२३ रोजी ह. भ. प. दत्तात्रय महाराज पवार पंढरपूर यांचे प्रवचन होणार असून ह. भ. प. सोपान काका महाराज काळे मार्डीकर यांचे कीर्तन होणार आहे. या दिवशी अल्पोपहार सुनील गुजर, दुपारचे अन्नदान रमेश माने तर संध्याकाळचे अन्नदान निवृत्ती जाधव यांच्यावतीने असणार आहे. शनिवार दि. २९/४/२०२३ रोजी ह. भ. प. नामदेव महाराज शिंदे मल्लेवाडी यांचे प्रवचन होणार आहे, तर ह. भ. प. भागवत महाराज संत ननंदीकर यांचे कीर्तन होणार आहे. या दिवशी अल्पोपहार राजेंद्र पाटील, दुपारचे अन्नदान के. के. कंस्ट्रक्शन मळोली चे किरण गुजर तर संध्याकाळचे अन्नदान नवनाथ जाधव यांच्या वतीने असणार आहे. रविवार दि. रोजी सकाळी ९ ते ११ ह. भ. प. श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी अल्पोपहार अशोक पवार, कालि महाप्रसाद चंद्रकांत जाधव, जयसिंग जाधव, अरुण पवार, नितीन जाधव यांच्यावतीने असणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मोफत पाणीपुरवठा ह. भ. प. पांडुरंग जाधव ,अष्टविनायक ॲक्वा मळोली आणि मथुरा ॲक्वा मळोली यांच्यावतीने करण्यात येणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहासाठी मंडप व लाईटचे व्यवस्थापन पप्पू लिगाडे धानोरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास देहूकर फडावरील सर्व वारकरी भजनी मंडळ उपस्थित राहणार आहे. या सप्ताहाच्या अधिक माहितीविषयी पाटील गुरुजी मो. ९८५०६३५७९२ आणि दिनेशसिंह शिंदे मो. ८८३०८०४२११ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ मळोली यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Localize por meio do software de sistema “Find My Mobile” que acompanha o telefone ou por meio de software de localização de número de celular de terceiros. https://www.mycellspy.com/br/tutorials/how-find-my-partner-phone-activity-on-my-phone/
Fantastic insights! Your perspective is very refreshing. For more details on this topic, visit: EXPLORE FURTHER. What do others think?
Great mix of humor and insight! For more, click here: READ MORE. Let’s discuss!