फलटणच्या राजकारणात रणजितदादाच ठरले ‘धुरंधर’; ८-८ च्या बरोबरीतही पंचायत समितीवर भाजप खासदार गटाचाच झेंडा!

फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीत ८-८ असे समसमान संख्याबळ असतानाही सभापतीपदी खासदार गटाच्या शिवांजली भोसले तर उपसभापतीपदी राजे गटाचे अमोल सस्ते यांची बिनविरोध निवड झाली.
लोकसभा पराभवानंतर रणजितदादा नाईक निंबाळकर यांनी सलग तीन विजय मिळवत आपणच राजकारणाचे ‘बाजीगर’ असल्याचे सिद्ध केले आहे.
फलटण (बारामती झटका)
फलटणच्या राजकीय आखाड्यात नेहमीच एखाद्या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटासारखा थरार पाहायला मिळतो. फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीत खासदार गट आणि राजे गट यांच्यात ८ विरुद्ध ८ असा ‘काँटे की टक्कर’ सामना रंगल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष याकडे लागले होते. मात्र, “हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है!” या प्रसिद्ध फिल्मी डायलॉगची अगदी तंतोतंत प्रचिती देत, माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत धोरणी खेळी केली आहे. त्यांनी प्रतिष्ठेच्या सभापतीपदावर आपल्या ‘खासदार’ गटाचा झेंडा फडकवून फलटणच्या राजकारणात आपणच ‘धुरंधर’ असल्याचा सणसणीत मेसेज दिला आहे. पंचायत समितीच्या या विशेष सभेत सभापतीपदी खासदार गटाच्या कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले, तर उपसभापतीपदी राजे गटाचे अमोल सस्ते यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आज सोमवारी फलटण पंचायत समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती निवडीची ही विशेष सभा पार पडली. पंचायत समितीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (खासदार गट) आणि शिवसेना (राजे गट) यांच्यात ८-८ असे समसमान सदस्य निवडून आल्याने अभूतपूर्व अशी ‘टाय’ची परिस्थिती निर्माण झाली होती.
नक्की सभापती कोण होणार, यावरून मोठी धाकधूक होती. मात्र, पडद्यामागे झालेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर दोन्ही गटांनी समंजस भूमिका घेत संभाव्य संघर्ष टाळला. अखेर सभापतीपदाची माळ खासदार गटाच्या कु. शिवांजली भोसले (साखरवाडी-पिंपळवाडी गण) यांच्या गळ्यात पडली, तर उपसभापतीपद राजे गटाचे अमोल सस्ते (जाधववाडी गण) यांना मिळाले.

राजकारणात “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!” असे का म्हटले जाते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची राजकीय कारकीर्द! गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह यांचा पराभव करण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणनीती आखली होती आणि त्यात त्यांना यशही मिळाले होते. मात्र, या मोठ्या पराभवाने खचून न जाता, “मैं झुकेगा नही!” या जिद्दीने रणजितदादांनी राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सचिन पाटील यांना आमदार केले. फलटण नगर परिषदेमध्ये बंधू समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना नगराध्यक्ष केले तर मित्राची कन्या शिवांजली भोसले हिला फलटण पंचायत समितीवर बिनविरोध सभापती केले खऱ्या अर्थाने विजयाची हॅट्रिक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



