ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

25 कोटींचा गैरव्यवहार करून संचालक मंडळ राजीनामा देऊन फरार…

अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाची कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अकलूज, संस्थेवर शासकीय प्रशासक नियुक्त संचालक मंडळावर कार्यवाही अटळ..

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अकलूज या संस्थेवर शासकीय प्रशासक नियुक्त झालेले असून संचालक मंडळावर कार्यवाही अटळ आहे.

चौकशीचा ससेमिरा व तक्रारी वाढताच तसेच शासकीय लेखापरीक्षणाच्या भीतीने संचालक मंडळ राजीनामा देऊन फरार झालेले आहे. मात्र सदरच्या पतसंस्थेची चौकशी शासकीय लेखापरीक्षण सुरू झालेली असल्याने माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकलूज, ता. माळशिरस यांचे कार्यालयातील सहाय्यक निबंधक पी. आर. सारडा यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 (1) अंतर्गत मानद सेक्रेटरी अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाची कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अकलूज, जि. सोलापूर यांनी संचालकांच्या राजीनाम्याचे या कार्यालयात दि. 13/01/2026 रोजी दिलेले पत्र व कार्यालयाची सुनावणी नोटीस या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 एक व महाराष्ट्र शासन सहकार व वस्त्रोद्योग विभाग मुंबई यांचे आदेशा अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पी. आर. सारडा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांनी अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाची कर्मचारी सहकारी पतसंस्था या संस्थेची समिती व्यवस्थापन समिती बरखास्त करून श्री. ए. जी. जाधव प्राधिकृत अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी एक अंतर्गत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकलूज यांची मुक्त संस्थेच्या प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी कार्यालयीन कामकाज सांभाळून मुक्त संस्थेचे कामकाज संस्था उपविधी सहकारी कायदा व नियमानुसार आपली जबाबदारी पार पाडावी व एक वर्षाच्या कालावधीच्या आत पुढील व्यवस्थापक समिती सदस्यांची निवडणूक पार पाडण्यास सहकार्य करावे, असा आदेश केलेला आहे.

अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाची कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान एकूण दहा संचालकांपैकी एकूण सहा संचालकांनी संस्थेकडे राजीनामा दिलेला होता. त्यामध्ये श्री. अमोल कृष्णात फुले, श्री. विजय अर्जुन कोळी, कु. नुरजहा मनुलाल शेख, श्री. नामदेव आबा कुंभार, श्री. शकील जब्बार मुलाणी, श्री. धन्यकुमार मारुतीराव साळवे यांनी संचालक पदाचे राजीनामे स्वेच्छेने दिलेले आहेत. व्यवस्थापक समिती 13 सदस्यांची असून सद्यस्थितीत दहा संचालक यथोचितरित्या निवडून आलेले आहेत. त्यापैकी सहा संचालकांनी राजीनामे दिल्यामुळे समितीच्या रचनेत दोष निर्माण झाल्याने संस्थेचे कामकाज चालविण्यास गणपूर्ती होऊ शकत नाही. व्यवस्थापन समिती निष प्रभावित करणे क्रमप्राप्त ठरत असल्याने सहाय्यक निबंधक यांची खात्री झाल्याने आदेश पारित केलेला आहे.

संस्थेकडे ठेवीदारांच्या 25 कोटिहून अधिक च्या ठेवी असून संस्थेकडे ठेवीदारांचे पैसे देण्यास संस्थेकडे एक रुपयाही शिल्लक नाही. यापूर्वीच संचालक मंडळाने सर्व पैसा हडप केल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.

आता शिक्षक सहायक निबंधकाकडे तक्रारी करत आहेत व चौकशीचा ससेमीरा व तक्रारी तसेच शासकीय लेखा परीक्षणाच्या भीतीने संचालक मंडळ राजीनामा देऊन फरार जरी झाले असले तरी प्रशासक नियुक्त झाल्याने संचालक मंडळावर कार्यवाही अटळ आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button