ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

ॲड. अभिषेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पानीव येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

५१ बहुराष्ट्रीय कंपन्याचा सहभाग; युवकांना रोजगाराची संधी

पानीव (बारामती झटका)

पानीव ता. माळशिरस येथील श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. अभिषेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पानीव येथे दि. २४ जानेवारी २०२४ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी विनोद बाबर यांनी दिली. यावेळी दिनेश शिंदे, भाऊसो वणवे, प्रमोद झगडे व सर्व प्राचार्य उपस्थित होते.

पुढे बोलताना विनोद बाबर यांनी सांगितले की, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शक श्रीलेखा पाटील, सहसचिव करण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून संस्थेच्या श्रीराम डिप्लोमा व डिग्री इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने डिप्लोमा, डिग्री, बीसीए, बीसीएस, बी. एस्सी, एमएससी (कम्प्युटर सायन्स), ॲग्रीकल्चर, बी. टेक., होर्टी अँड एबीएम कॉलेजेस, डी. फार्मसी अँड बी. फार्मसी, बी.ए., बीकॉम, बी.बी.ए. व आयटीआय क्षेत्राशी निगडित सुमारे ५१ औद्योगिक क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना निमंत्रित केलेले असून त्याद्वारे अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

तरी पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर महेश दिरंगे, डिप्लोमाचे प्राचार्य प्रमोद खंदारे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort