ताज्या बातम्यासामाजिक

ह. भ. प. अमोल महाराज सूळ, मोरोची यांचे बोराटवाडी येथे सुश्राव्य कीर्तन होणार…

स्वर्गीय भगवानराव रामचंद्र गोरे (दादा) यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन…

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडून मित्रपरिवार व नातेवाईक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन…

बिदाल (बारामती झटका)

रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तथा बोराटवाडी गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व प्रगतशील बागायतदार स्वर्गीय भगवानराव रामचंद्र गोरे (दादा) यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त ह. भ. प. अमोल महाराज सूळ, मोरोची यांचे शनिवार दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये सुश्राव्य किर्तन होणार आहे. कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी आवाहन केलेले आहे.

स्वर्गीय भगवानराव गोरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपला संसार करीत मुलांवर चांगले संस्कार केलेले आहेत. त्यांना अंकुशभाऊ, जयाभाऊ, शेखरभाऊ अशी तीन मुले तर सुरेखा पखाले एक मुलगी आहे. सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. तिन्ही मुलांनी स्वकर्तृत्वातून समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. जयाभाऊ यांच्या राजकीय जडणघडणीत स्वर्गीय भगवानराव उर्फ दादा यांचा सिंहाचा वाटा होता.

रेशन दुकानदार असणारे दादा मृत्यूसमयी पालकमंत्र्यांचे पिताश्री अशी त्यांची नव्याने ओळख झालेली होती. दादांच्या अचानक जाण्याने गोरे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. बघता बघता वर्ष पूर्ण झालेले आहे.

प्रथम पुण्यस्मरणसाठी उपस्थित राहावे, असे गोरे परिवार यांचे कडून आवाहन करण्यात येत आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button