आय. आर. एस. समीर वानखेडे आणि सिने अभिनेत्री क्रांती रेडकर या दाम्पत्यांचा नातेपुते येथील पांढरे परिवार यांच्या वतीने सन्मान संपन्न झाला.

पांढरे परिवार व नातेपुतेकरांच्या जंगी स्वागताने समीर वानखेडे व क्रांती रेडकर दांपत्य भारावून गेले होते…
नातेपुते (बारामती झटका)
आय. आर. एस. समीर वानखेडे व सिने अभिनेत्री क्रांती रेडकर या दांपत्याचे नातेपुते नगरीमध्ये श्री गणपत कृष्णा पांढरे परिवार व मित्रपरिवारांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
प्रशासकीय सेवेमध्ये दमदार कामगिरीमधून उत्कृष्ट अधिकारी म्हणून सुपरिचित असणारे आय. आर. एस. अधिकारी समीरजी वानखेडे व चित्रपट सृष्टीमध्ये अभिनयातून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणाऱ्या क्रांती रेडकर माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील मेजर अनिल माने यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे निमित्ताने आलेले होते. या उभय दांपत्यांचे नातेपुते नगरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी समीर वानखेडे यांचा सत्कार बळीराजा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संचालक गणपत कृष्णा पांढरे यांच्या शुभहस्ते तर सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा सन्मान पांढरे परिवारातील महिलांच्या शुभ हस्ते करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी, हलग्यांचा, कडकडाट, कार्यकर्त्यांचा उत्साह अशा पांढरे परिवार व नातेपुतेकरांच्या जंगी स्वागताने दांपत्य भारावून गेलेले होते.


यावेळी नातेपुते ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुरेश गणपत पांढरे दाते प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य भारत वसंत पांढरे, बळीराजा ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन संतोषमालक काळे, व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, किशोर दगडे, चंद्रकांत काळे, राजू पांढरे, रमेश पांढरे, धनु पांढरे, नामदेव पांढरे, ऋषिकेश पांढरे, समीर सोरटे, मेंबर सोनवळ, वकील साहेब, सोमनाथ सावंत मेंबर, नातेपुते सोसायटीचे चेअरमन आजेश पांढरे, माजी सरपंच रावसाहेब पांढरे, शिवाजी पांढरे, नगरसेवक रणजीत पांढरे, मयूर पांढरे, रणजीत पांढरे, बबन अर्जुन, भागवत रुपनवर, तुषार पांढरे, संजय पांढरे, भाऊसाहेब पोळ, सुरेश ढेकळे, प्रथमेश पांढरे, आप्पा सावंत, बुड्ढा मिस्तरी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng