इस्रो-नासा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव ढोकच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

अर्पिता बारगजे प्रथम, अपूर्वा जाधव द्वितीय; विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेतून अभिनंदनाचा वर्षाव
गेवराई (बारामती झटका) गणेश भाऊ ढाकणे यांजकडून
वडगाव ढोक, ता. गेवराई, जि. बीड, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी इस्रो-नासा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले गुण मिळवत आपल्या मेहनतीची, जिद्दीची आणि अभ्यासातील सातत्याची प्रचिती दिली. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडली असून परिसरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
या परीक्षेत अर्पिता शरद बारगजे (इयत्ता ७ वी) हिने ९० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अपूर्वा अविनाश जाधव (इयत्ता ६ वी) हिने ८८ गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. अनुष्का संतोष पुरी (इयत्ता ७ वी) आणि प्राची परमेश्वर ढोक (इयत्ता ६ वी) यांनी प्रत्येकी ७४ गुण मिळवले. प्रशांत भागवत कदरे (इयत्ता ६ वी) आणि सान्विका सुदर्शन घोडके (इयत्ता ७ वी) यांनी प्रत्येकी ७२ गुण मिळवले.
तसेच गणेश कृष्णा भाबड (इयत्ता ७ वी) याने ६८ गुण, प्रीतम बप्पासाहेब वायभसे (इयत्ता ७ वी) याने ६४ गुण, सोमदेव भारत ढाकणे (इयत्ता ७ वी) याने ५८ गुण आणि तुषार युवराज गीते (इयत्ता ६ वी) याने ५८ गुण मिळवले.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, नियमित अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक व शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पालक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
ही शाळा केंद्र मन्यारवाडी, ता. गेवराई, जि. बीड अंतर्गत येते. विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशाची नवनवी शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



