जिल्हा “नियोजन” समितीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याचे योग्य “नियोजन” त्रिमूर्ती लोकप्रतिनिधी निष्ठावानांना न्याय द्यावा…

पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये 33 कॅबिनेट व 06 राज्यमंत्री यांचा शपथविधी होऊन महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाच्या नियुक्ती पार पडलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते त्यांच्याकडून महायुती व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याचे योग्य नियोजन त्रिमूर्ती लोकप्रतिनिधींनी करून निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, अशी माळशिरस तालुक्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांची चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्त्यांनी समाजामध्ये फेक निरेटिव्ह तयार करून मतदारांची दिशाभूल केलेली होती. त्यामुळे महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार येईल, अशा अपेक्षेने महायुतीमधील घटक पक्षांचे काही नेते व कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या उमेदवारांचा प्रचार व प्रसार केलेला होता. तरीसुद्धा महाराष्ट्रात महायुतीचे निर्विवाद वर्चस्व मतदारांनी दिलेले आहे. सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांचे गद्दारी करणारे नेते व कार्यकर्ते तो मी नव्हेच अशा पद्धतीने महायुतीच्या लोकप्रतिनिधींच्या पुढे पुढे करताना दिसत आहे.
माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वसामान्य जनता व सत्तर वर्षांमध्ये रखडलेला विकास अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून गोरगरीब व रुग्णांची सेवा करणारे आरोग्यदूत लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांना माळशिरस तालुक्यातील एक लाख आठ हजाराच्या पुढे मताधिक्य निष्ठावान कार्यकर्ते व मतदार यांच्यामुळे मिळालेले आहे. महायुतीच्या नेते व कार्यकर्ते यांनी गद्दारी करूनसुद्धा गोरगरीब व सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली होती.
महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय व अनेक घटक पक्षांचा समावेश आहे. माळशिरस तालुक्यात प्राधान्याने राष्ट्रवादीचे शरदबापू मोरे, रमेशभाऊ पाटील, शिवसेनेचे राजाभाऊ हिवरकर पाटील, सतीश सपकाळ, आरपीआयचे सोमनाथ भोसले, मिलिंद सरतापे, रोहित उर्फ बादल सोरटे अशा नेत्यांचा समन्वय ठेवून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याचे योग्य नियोजन त्रिमूर्ती लोकप्रतिनिधी यांनी करून निष्ठावानांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची वाढलेली आहे.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येऊ नये, अशा पद्धतीने राजकीय व्युहरचना आखणारे नेते व कार्यकर्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौऱ्याच्या वेळेला स्वागत समारंभात निष्ठावान कार्यकर्त्यांनी पाहिलेले आहेत. अनेक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणाचा तरी हात पकडून जिल्हा नियोजनमध्ये पत्र देण्याचे तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्ते अस्वस्थ झालेले आहेत. यासाठी पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते या त्रिमूर्ती लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवून माळशिरस तालुक्यातील गद्दारांना त्यांची जागा दाखवून निष्ठावंत कार्यकर्त्यांना ताकद द्यावी. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निश्चितपणे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज तयार राहणार असल्याची चर्चा माळशिरस तालुक्यात सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.