काय सांगताय… तुतारी वाजवणार “गडी”, अजितदादांची नेसायला लागलं गुलाबी “साडी”
“जेलवारी” पेक्षा” नऊवारी” बरी अशी राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे.
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत महायुती मधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी 288 जागांपैकी 236 जागांवर निर्विवाद वर्चस्व संपादन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक नेत्यांचे धाबे दणाणलेले आहेत. भ्रष्टाचारीत संस्था व भ्रष्ट कारभार केलेले तुतारी वाजवणारं ‘गडी’, अजितदादांची नेसायला लागल्यात गुलाबी ‘साडी’, अशी दयनीय अवस्था राज्यकर्त्यांची महायुतीने केलेली असल्याने “जेलवारी” पेक्षा “नऊवारी” बरी अशी राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे.
महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महायुतीच्या सरकारने व्यक्तिगत व सार्वजनिक हिताचे निर्णय घेतलेले होते. त्यामध्ये शेतीपंपांचे विज बिल माफ, शेतकऱ्यांना दुष्काळ निधी, गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला मोफत धान्य, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वृद्धांना वयोश्री योजना अशा अनेक योजनेंबरोबर सर्वात महत्त्वाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीच्या 236 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी यशस्वी ठरलेली योजना होती. त्यामध्ये सुरुवातीस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सदरच्या योजनेची टिंगल टवाळी करून कोर्टामध्ये दाद मागितलेली होती. परंतु त्यांना अपयश आलेले होते. लाडक्या बहिणींचे लाडके दाजी एक चपटी पिऊन मटणाचे हाडूक चघळत होते आणि महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळत होते. मात्र, लाडक्या बहिणी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभा राहिल्या. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागांवर विजयी झालेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते भयभीत झालेले आहेत. कारण देवाभाऊ करेक्ट कार्यक्रम करीत असतात. यासाठी तुतारी वाजवणार गडी अजितदादांच्या संपर्कात येऊन गुलाबी साडी नेसण्याच्या प्रयत्नात आहेत. अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
मात्र, दुसरा प्रवाह लाडक्या बहिणीनी सत्तेत बसविलेले असल्याने सावत्र बहिनींना अजितदादांनी गुलाबी साडी देऊ नये, असा सूर महाराष्ट्राच्या जनतेमधून येत आहे. तुतारी वाजवणाऱ्या गड्यांच्या देवेंद्र फडणवीस यांनी कमळाच्या पाकळ्या मिटलेल्या आहेत. गद्दार खोके असे म्हणून एकनाथ शिंदे यांची मानहानी केलेली असल्याने शिवसेनेचे धनुष्यबाणाचे अणकुचीदार टोक काढून आहेत. त्यामुळे अजितदादांची गुलाबी साडी बरी, अशी तुतारी वाजवणाऱ्या माणसांची अवस्था झालेली आहे. अजितदादा हुशार आहेत, अशा सावत्र बहिणींना कधीही थारा देणार नाहीत अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमधून चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.