मा. आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत चि. सागर वाघमोडे, तामशिदवाडी आणि चि. सौ. कां. शैला ढेकळे, उंबरे (द) यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न.

नातेपुते (बारामती झटका)
कै. लक्ष्मण बापू वाघमोडे यांचे नातू व श्री. ज्ञानदेव लक्ष्मण वाघमोडे रा. तामशिदवाडी, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. सागर (M.Sc. Organic Chem.) आणि श्री. गोविंद यशवंत ढेकळे यांची नात व श्री. दत्तात्रय गोविंद ढेकळे रा. उंबरे (द), ता. माळशिरस यांची कन्या चि. सौ. कां. शैला (B. Tech Com. Engg) यांच्या शाही शुभ विवाह सोहळा शनिवार दि. २७/६/२०२६ रोजी दुपारी १.०० वा. राज आनंद मंगल कार्यालय, नातेपुते (दहिगाव रोड), ता. माळशिरस येथे शाही शुभविवाह सोहळा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला..

या शुभ विवाह सोहळ्याप्रसंगी वधूवरांना अक्षतारूपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक श्री. सुरेश (आबा) पालवे पाटील मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य सोलापूर, श्री. शिवाजीराव देशमुख मा. नगराध्यक्ष, माळशिरस नगरपंचायत, श्री. दत्तात्रय गोविंद ढेकळे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माळशिरस, सदस्य, लाडकी बहिण योजना, माळशिरस तालुका यांच्या वतीने करण्यात आलेले होते.
वाघमोडे पाटील व ढेकळे यांच्या विनंतीला मान देऊन माजी आमदार राम सातपुते, माजी जिल्हा नियोजन सदस्य सुरेश आबा पालवे पाटील, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सोपान काका नारनवर, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकारामभाऊ देशमुख, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेव तात्या देशमुख, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, युवा नेते जीवन कुमार जानकर, जिल्हा परिषद सदस्य विष्णुपंत नारनवर, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब माने पाटील, राजेंद्र मधुकर पाटील, प्रवीण वाघमोडे, युवा नेते रामभाऊ कचरे, राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अशोकदादा देशमुख, फोंडशिरसचे उपसरपंच दादासाहेब रणदिवे, शिंदेवाडी सरपंच मल्हारी भाऊ शिंदे, कळंबोली सरपंच संजय वाघमोडे, कोथळे सरपंच अमोल माने, मारकडवाडी चे माजी सरपंच अमित पाटील, गुरसाळे गावचे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सोमनाथ चव्हाण, सतीश मोठे, विक्रम चव्हाण गुरसाळे, गोरख गुळवे, सरपंच टाकळी करमाळा, लकडे पाटील करमाळा, नागेश वाघमोडे पाटील, गणेश पाटील डोंबाळवाडी, संजय पाटील मारकडवाडी, डॉक्टर अप्पासाहेब वाघमोडे, अक्षय भैय्या भांड, शरद रुपनवर, बांगर्डे सरपंच शंकर मेटकरी, यांच्यासह पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, रायगड, येथील मित्रपरिवार नातेवाईक व तामशीदवाडी व उंबरेदहिगाव गावातील ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



