आरोग्यताज्या बातम्यासामाजिक

माँ बाबा फाउंडेशन, सदाशिवनगर आणि शंकर आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन..

सदाशिवनगर (बारामती झटका)

माँ बाबा फाउंडेशन, सदाशिवनगर आणि शंकर आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने अंधत्वाकडून दृष्टीकडे मोतीबिंदू मुक्त माळशिरस तालुका अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन रविवार दि. 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 09 ते दुपारी 02 वाजेपर्यंत जुने पालखी मैदान, सदाशिवनगर येथे करण्यात आलेले आहे.

सदरच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी येताना आधार कार्ड व रेशन कार्ड (पिवळे व केसरी) झेरॉक्स प्रत घेऊन यावी. तसेच मधुमेह व रक्तदाबाची औषधे सुरू असल्यास ती देखील घेऊन यावीत. पेशंटला ऑपरेशनसाठी जाण्याची, राहण्याची, जेवणाची व परत आणून सोडण्याची मोफत सोय केली जाईल. तरी गरजूंनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करण्यासाठी हुसेन मुलाणी 9970775936, गोरक्षनाथ पालवे 9890987298, प्रसाद भोसले 9890323436, अंकुश धाईंजे 7558754963, प्रमोद दळवी 9561218191 या नंबरशी संपर्क साधावा, असे आयोजकाकडून सांगण्यात आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button