ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्यावतीने मांडवे गावचे बिनविरोध सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार.

मांडवे (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणाऱ्या मांडवे ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंच सौ. शितल अर्जुन दुधाळ व उपसरपंच सौ. स्वाती राजेंद्र शिंदे यांचा सत्कार करून माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब एकनाथ देशमुख यांनी पंढरपूरचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, शाल व श्रीफळ देऊन अर्जुन दुधाळ व राजू शिंदे यांचा निवासस्थानी सत्कार केला. आणि सरपंच व उपसरपंच यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

भविष्यात आपल्या कारकिर्दीत आपल्या हातून सर्वसामान्य जनतेची सेवा करून गावचा कारभार सुरळीत होऊन आपल्या कार्यकालातील सर्वसामान्यांची केलेली सेवाकार्याची सर्वांना आठवण राहील, अशा शुभेच्छा देशमुख यांनी मांडवे गावच्या सरपंच आणि उपसरपंच यांना दिल्या. यावेळी नागेश वाघमोडे व आप्पासाहेब देशमुख मित्रपरिवार उपस्थित होता.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. This was a very well-written article. The author’s perspective was fascinating and left me with much to consider. Let’s talk more about this. Feel free to check out my profile for more related reads.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort