केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांची महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ श्रीपुर येथे जाहीर सभा…

श्रीपुर (बारामती झटका)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांची माढा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ दि. 02 मे 2024 रोजी सकाळी 09 वाजता श्रीपुर, ता. माळशिरस येथे छत्रपती शिवाजी चौक येथे जाहीर सभा होणार आहे. तरी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
चौदाव्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत महायुतीमध्ये अनेक पक्ष आहेत. त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हाही पक्ष समाविष्ट आहे. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना महायुतीने पुनश्च उमेदवारी दिलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभहस्ते अकलूज येथील विजय चौकामध्ये प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. 30 एप्रिल रोजी विकासपुरुष भारताचे कणखर व दमदार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची माळशिरस येथे महाविजय संकल्प सभा झालेली आहे. त्यानंतर आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांची श्रीपुर येथे भव्य दिव्य सभा होणार आहे. यासाठी आरपीआयचे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी कामाला लागलेले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.