महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार फलटण तालुक्यातील सासकल येथील श्री. बबन रामचंद्र मुळीक यांना जाहीर

फलटण (बारामती झटका)
श्री. बबन रामचंद्र मुळीक गाव सासकल, ता. फलटण, जि. सातारा येथील फलोत्पादक शेतकरी असून त्यांनी डाळींब, सीताफळ, आव्हाकोडो ची लागवड केली आहे. कष्ट तसेच जिद्दीच्या जोरावर त्यांनी माळरानावर फळबाग फुलवली आहे. शेतामध्ये विविध प्रयोग व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून फळ पिकांचे उत्पादन घेत आहेत. सेंद्रिय निविष्टामध्ये गांडूळ खत युनिट उभारणी करून खताचे उत्पादन घेऊन फळ पिकास गांडूळ खत मात्रा दिले जातात. तसेच दशपर्णी अर्क, जीवामृत, व्हर्मिव्हाश चा वापर करतात.
कृषी विभागाच्या विविध उपक्रमामध्ये ते सहभाग नोंदवत असतात.ज्ञकृषि विभागाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड अंतर्गत अॅव्होकॅडो ची त्यांनी महाराष्ट्रात पहिली लागवड केली आहे.
कृषि विभागाच्या AI (कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फळपीक शेती ) तंत्रज्ञानाच्या आधारे फळबाग लागवड पासून डाळींब, सीताफळ, अॅव्होकॅडो, वॉटर ॲपल उत्पादन घेत आहेत. तसेच २३ प्रकाची इतर फळपीके तसेच इतर पिके लागवड केली आहे. प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजनेद्वारे संपूर्ण फळबाग १००% ठिबक सिंचनद्वारे पाणी व्यवस्थापन केले आहे.
श्री. बबन रामचंद्र मुळीक शेतकरी ते ग्राहक फळांची विक्री करतात. त्यांच्या पत्नी संगीता बबन मुळीक, मुलगा अजिंक्य बबन मुळीक, निखिल बबन मुळीक यांची अमूल्य साथ असल्याने शक्य झाल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

गावचे सहाय्यक कृषी अधिकारी तथा कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांनी कृषि विभागचे विविध उपक्रम राबवतात, त्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागाचा मानाचा सर्वउत्तम पुरस्कार समजला जाणारा उद्यान पंडित पुरस्कार श्री. बबन रामचंद्र मुळीक यांना कोल्हापूर विभागातून जाहीर झाल्याबद्दल जिल्हा अधिकारी सातारा संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा याशनी नागराजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी फलटण खलिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषि अधिकारी विडणी अशोक जगदाळे, उप कृषि अधिकारी विडणी अजित सोनवलकर, सहाय्यक कृषी अधिकारी सासकल तथा कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांनी या निवडीबद्दल अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



