महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांची महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट….

महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही – राजाभाऊ राऊत
महाळुंग (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ विधान परिषद निवडणुकीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार बार्शीचे माजी आमदार राजेंद्र उर्फ राजाभाऊ राऊत यांनी माळशिरस तालुक्यातील महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन भविष्यात सकारात्मक भूमिका स्पष्ट करून नगरपंचायतीच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपस्थित नगरसेवक यांना दिली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत महाळुंग गावचे ज्येष्ठ नेते लोकनेते स्वर्गीय कुंडलिक भाऊ रेडे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली.

या बैठकीस गटनेते राहुल आप्पा रेडे, नगराध्यक्ष अशोकजी चव्हाण, नगरसेवक प्रकाश नवगिरे, नगरसेवक मोहसीन पठाण, नगरसेवक रावसाहेब सावंत पाटील, नगरसेवक निनाद पटवर्धन, नगरसेवक विक्रमसिंह लाटे, नगरसेवक शिवाजी रेडे, नगरसेवक नामदेव पाटील, जगदीश इंगळे, ॲड. विजय भगत, समर्थ रेडे व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



