ताज्या बातम्यासामाजिक

मळोली गावातील प्रशांत जाधव गुरुजी यांचे अपघाती दुःखद निधन…

मळोली (बारामती झटका)

मळोली, ता. माळशिरस गावातील प्रशांत विठ्ठल जाधव गुरुजी यांचे वयाच्या 46 व्या वर्षी मोटर सायकल अपघातात शुक्रवार दि. 2 ऑक्टोंबर 2026 रोजी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे..

प्रशांत जाधव गुरुजी तांदुळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी नंबर दोन येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी दैनिक पुण्यनगरी वर्तमानपत्रामध्ये मळोली प्रतिनिधी म्हणून काम केलेले होते. वेळापूर वरून काम आटोपून मळोली गावाकडे जात असताना वेळापूर नजीक नंदनवन पाटी या ठिकाणी मोटरसायकल अपघात झाला आहे.

अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे. त्यामुळे रक्तस्त्राव झालेला आहे. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे पार्थिव देह वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र वेळापूर येथे शवविच्छेदन करण्याकरता आणण्यात आलेले आहे. शव विच्छेदन केल्यानंतर पार्थिव देह निवासस्थानी ठेवून आजच दुपारी 02.30 वा. मळोली गावातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत..

प्रशांत गुरुजी यांच्या दुःखद निधनाने जाधव परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. जाधव परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व प्रशांत गुरुजी यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button