ताज्या बातम्या

मळोली येथे ह. भ. प. पांडुरंग महाराज घुले यांचे सुश्राव्य कीर्तन होणार संपन्न

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे ९ वे वंशज वै. श्रीगुरु मधुसूदन महाराज देहूकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन

मळोली (बारामती झटका)

मळोली ता. माळशिरस येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे ९ वे वंशज श्रीगुरु देहूकर फडाचे जेष्ठ अधिकारी वैकुंठवासी श्रीगुरु मधुसूदन महाराज देहूकर (अण्णा) यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दि. २०/०९/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये गाथा मंदिर श्री क्षेत्र देहूचे अध्यक्ष ह. भ. प. पांडुरंग महाराज घुले यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

नातेवाईक व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन देहूकर फड व समस्त देहुकर परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button