माळशिरस मध्ये ‘देव इटोमोटीव्स’ भव्य शोरूम व वर्कशॉप चे उद्घाटन समारंभ होणार…

माळशिरस (बारामती झटका)
देव इटोमोटीव्स या अभिनवशील व पर्यावरण पूरक तीन चाकी वाहनाच्या सोलापूर मधील माळशिरस मध्ये सर्वप्रथम भव्य शोरूम आणि वर्कशॉप चे उद्घाटन शनिवार दि. 13 जून 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सौ. चंद्रला व श्री. प्रसाद देव आणि सौ. आदिती व श्री. केदार देव या उभय दाम्पत्यांच्या शुभ हस्ते देशपांडे बिल्डिंग, पंढरपूर रोड, पोस्ट ऑफिस जवळ, माळशिरस, जि. सोलापूर येथे होणार आहे..
पुर्णतः भारतीय तंत्रज्ञानातून साकारलेल्या नाविन्यपूर्ण डिझाईनच्या रिक्षामुळे प्रदूषण मुक्त प्रवासी वाहतुकीचे एक नवे पर्व सुरू होत आहे. तरी आपण सदर कार्यक्रमास उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आग्रहाचे निमंत्रण देव परिवार यांच्या वतीने मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतक व वाहनधारक यांना देण्यात आलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



