ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड….

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी निवड केली…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये खजिनदार प्रवक्ता प्रत्येकी एक अकरा, उपाध्यक्ष सहा, सरचिटणीस अकरा, तालुकाध्यक्ष 12, प्रांतिक सदस्य 22 अशा कार्यकारणी सदस्यांच्या निवडी जाहीर केलेल्या आहेत. त्यामध्ये माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष शिवाजीराव ज्ञानदेव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेली आहे.

माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत शिवाजीराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेली होती. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना विजयी प्रमाणपत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरसेवक असे प्रमाणपत्र दिलेले होते.

महाराष्ट्रामध्ये सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होऊन राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झालेले आहेत. परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये माळशिरस नगरपंचायत निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य व तत्कालीन उपनगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवाजीराव देशमुख यांनी माळशिरस शहराच्या विकासासाठी ऐतिहासिक, राजकीय भाजप व राष्ट्रवादीची युती करून नगरपंचायतीवर भाजपचे डॉ. आप्पासाहेब देशमुख नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे शिवाजीराव देशमुख उपनगराध्यक्ष झालेले होते. डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने माळशिरस नगरपंचायतीमध्ये विविध विकासकामे मंजूर करून काही कामे पूर्ण तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीच्यावेळी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरलेल्या फॉर्मुल्याप्रमाणे डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला होता. सदरच्या नगराध्यक्ष पदाच्या जागी शिवाजीराव देशमुख यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झालेली होती. शिवाजीराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बी फार्मवर निवडून आलेले होते. माळशिरस तालुका अध्यक्ष पदी निवड झालेली असल्याने अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य झालेले आहेत. सध्या भाजप व अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस विचाराचे सरकार असल्याने माळशिरस नगरपंचायतीमध्ये विकासकामे करण्याकरता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. माळशिरस तालुक्यात शिवाजीराव देशमुख यांच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

4 Comments

  1. Well How about fe80::1, is that so hard? Just set the static address of that machine to thisOr if you have a global address, where the LAN netmask always is /64, thus the network is the first 64 bitExample 2001:dead:beef:020::10/64 or 2001:dead:beef:020::11/64Is those that hardRemember, IPv6 is designed from the beginning to have many addresses, which IPv4 was notAnd really, do you really need to remember an IPv6 address, when you use DNS or mDNS in a link local context Then you only need to know the name, not any numbers, being decimal or hexadecimal I do prefers to remember name compared to numbers1: A Link local address that always start with fe80::/64 and the second half is based on the device MAC address or random 48 bit number And one bit in the top 16 bit group of the four in the node address part is set to 1 and FF:FE in the middle This is link local and it always exists If Link local address doesn’t exist, IPv6 wouldn’t work2: A global address (always start with 2 or 3, that is 2000::/3) that the network part (high 64 bits) it gets from the router and the lower 64 bit is from the MAC address, like link local or random, like link local This generation of global address can be turned off3: A global address that is given from DHCPv6 server Works like DHCPv4 Can be random or static set like with IPv4 DHCP Can be turned off, or used instead of 24: A dynamically generated IPv6 address where the host part is randomly generated This is only used until a new one is generated after 5 minutes or so It is used for all traffic that is used to reach other server, for surfing web sites for instance When a new is generated the old will stay until all packages that is expected to go back has come back or timed out So there might be may of this kind of address Used so web sites should not be able to track what one does based on IPv6 address It is for privacy You can turn this off5: A static address, that you set manually, and is used in DNS to reach a certain service and need to be set statically so it doesn’t change Only uses for identify services You can have more then one of these Can for instance be the simple type in the beginning

  2. A very informationrmative post and lots of really honest and forthright comments made! This certainly got me thinking a lot about this issue so cheers a lot for dropping!

  3. buy priligy in uae With a pipe on the boss s chair, he carefully struck a match to light it, quick way to lower blood pressure naturally waved his hand to extinguish the match, puffing out smoke, Margarete Mongold said, The soldiers are here to bring the enemy s water to how quickly can you lower blood pressure vitality has already been seriously damaged, and there is no need to worry about it in a short time

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button