नातेपुते येथे हॉटेल राधाकृष्ण फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी या नवीन फर्मचा दोन भाऊंच्या शुभहस्ते भव्य उद्घाटन समारंभ….

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार…
नातेपुते (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भगवानराव गोरे उर्फ जयाभाऊ व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम विठ्ठल सातपुते उर्फ रामभाऊ या उभय भाऊंच्या शुभहस्ते रविवार दि. 16/02/2025 रोजी सायंकाळी 05 वाजता पुणे-पंढरपूर बायपास रोड, नातेपुते, येथे हॉटेल राधाकृष्ण फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी या नूतन फर्मचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.

हॉटेल राधाकृष्ण फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी या नूतन फर्मचा भव्य उद्घाटन समारंभ दोन भाऊंच्या शुभ हस्ते व नातेपुते नगरपंचायतीचे ज्येष्ठ नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, शिवप्रसाद उद्योग समूहाचे उद्योजक शरदबापू मोरे, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक दादासाहेब उराडे, सुजय माने पाटील, माण भाजप नेते अरुण भुजबळ, विडणी सरपंच सागर अभंग, पांढरे इलेक्ट्रॉनिकचे बॉस उद्योजक राजकुमार पांढरे, फोंडशिरसचे वस्ताद मधुकर रणदिवे, नातेपुतेचे उद्योजक रवींद्र डुडू, प्रगतशील बागायतदार अर्जुन जठार, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक दीपकआबा काळे, नगरसेविका सौ. मायाताई ज्ञानेश्वर उराडे, नगरसेविका सौ. सविता शशिकांत बरडकर, नगरसेविका सौ. शर्मिला संजय चांगण, साईकृपा पतसंस्थेचे चेअरमन कैलास बरड, सेवानिवृत्त शिक्षक अंकुश बरडकर, महामिन फलटणचे संपादक दशरथ फुले, मांडवे गावचे माजी सरपंच अर्जुन दुधाळ, फोंडशिरसचे सरपंच पोपटराव बोराटे, फडतरीचे माजी सरपंच सदाशिव ननवरे, लक्ष्मी वीट कारखान्याचे उद्योजक अंबादास बरडकर, पांढरे इलेक्ट्रॉनिक्सचे विजयराव पांढरे, सुभाष यादव, समाजरत्न सोसायटीचे चेअरमन सावता बोराटे, समाजरत्न सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुनील बरडकर, नातेपुते ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उत्तम गलबु बरडकर, बिल्डर देविदास खिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे श्रीमती मंगल संपत बरडकर, श्री. सोमनाथ संपत बरडकर, चि. पूरब सोमनाथ बरडकर आणि समस्त बरडकर परिवार नातेपुते यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.