Uncategorized

माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती युवा नेते किशोरभैय्या सुळ पाटील यांच्या वाढदिवसाला अनोखा संकल्प.

माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती युवा नेते किशोरभैय्या सुळ पाटील यांचा १ डिसेंबर या तारखेला वाढदिवस असतो. सुळ पाटील घराण्याचा वसा व वारसा जपत राजकारणात सक्रिय होऊन गावापासून तालुक्याच्या राजकारणात कमी वयात सुसंस्कृत व मनमिळावू स्वभावामुळे सर्व जाती धर्मातील लोकांच्या व तरुणांच्यामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.

वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव सर्व स्तरातून होत असतो. यंदाच्या वाढदिवसाला कर्जत जामखेडचे कर्तव्यदक्ष व महाराष्ट्राचे युवा आमदार रोहितदादा पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे. सदरची यात्रा वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. १ डिसेंबर रोजी रोहितदादा पवार यांच्या युवा संघर्षयात्रेत सहभागी होऊन त्यांच्या समवेत वाढदिवसाचा दिवस घालविण्याचा निर्धार करून वाढदिवसाचा अनोखा संकल्प केलेला आहे. उपसभापती युवा नेते किशोरभैय्या सुळ पाटील यांनी हितचिंतक मित्रपरिवार व नातेवाईक यांना जाहीर नम्र आवाहन केलेले आहे. आमदार रोहितदादा पवार यांच्या संघर्षयात्रेत पायी चालत जाऊन आमदार यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला असल्याने माळशिरस तालुक्यात उपलब्ध नसल्याने सर्वांनी याची नोंद घ्यावी व आपले असेच ऋणानुबंधाचे प्रेमाचे व सलोख्याचे संबंध राहो, अशा पद्धतीने नम्र विनंती केलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button