ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्यातील मनोमिलनानंतर फलटण तालुका रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी एकवटला.

फलटण (बारामती झटका)

माढा लोकसभेतील निवडणुकीच्या अनुषंगाने मोहिते पाटील व मोहिते पाटील पारंपारिक विरोधी गट यांचे मनोमिलन झाल्यानंतर माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा फलटण तालुका विजयासाठी एकवटलेला आहे, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदार संघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविलेले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात फलटण विधानसभा मतदार संघ येत आहे. फलटण मतदार संघ हा हक्काचा व घरचा मतदार संघ आहे. या मतदारसंघात गतवेळच्या निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रथमच मतदान केलेले होते. राजे गटाचे वर्चस्व असतानासुद्धा मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून विजयामध्ये सहभागी झालेले होते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यामधील सिंचन, रेल्वे, नाईक बुमवाडी एमआयडीसी, रस्ते अशा अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. मतदार संघात विकासात्मक कार्य केलेले असल्याने केंद्रीय व राज्यातील नेतृत्व यांनी पुनश्च माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघातील धैर्यशील मोहिते पाटील उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, निवडून येण्याची क्षमता नसल्याने भारतीय जनता पक्षाने उमेदवारी डावलली आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय जुळवाजुळव करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील पूर्वीपासून पारंपारिक विरोधी गट यांच्या सोबत मनोमिलन केलेले आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील मतदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी एकवटलेला आहे.

फलटणमध्ये पारंपारिक विरोधी असणारे राजे गटातील नेते व कार्यकर्ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम उभे राहताना पहावयास मिळत आहे. राजे गटातील नेते व कार्यकर्ते उघड उघड बोलत आहेत. विधानसभेला तुमच्या सोबत मात्र, लोकसभा निवडणुकीला तुम्ही स्वतः उभे नसल्यामुळे आम्ही भूमिपुत्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे. निवडणूक लोकसभेची देशाची असली तरी सुद्धा फलटणकरांच्या अस्मितेची निवडणूक आहे‌. माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील विरोधी गटाबरोबर मनोमिलन करीत असतील तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमचे काय घोडे मारले आहे का, असे सुद्धा उघड उघड राजे गटातील नेते व कार्यकर्ते बोलत आहेत.

फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी फलटण तालुका विजयासाठी एकवटलेला आहे, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर माळशिरस तालुक्यात सुद्धा उलट सुलट चर्चेला उधाण आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort