ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस विधानसभेचे स्व. मा. आ. चांगोजीराव उर्फ बाबुराव देशमुख यांच्या निवासस्थानी राजाभाऊ राऊत यांची सदिच्छा भेट…

विधान परिषद निवडणुकीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ राऊत यांनी अकलाई देवीचे दर्शन घेऊन स्वर्गीय चांगोजीराव देशमुख यांचा आशीर्वाद घेतला..

अकलूज (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार बार्शीचे माजी आमदार राजेंद्र उर्फ राजाभाऊ राऊत प्रचारार्थ माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता अकलूजचे ग्रामदैवत श्री अकलाई देवीचे दर्शन घेऊन माळशिरस विधानसभेचे बिनविरोध माजी आमदार स्वर्गीय चांगोजीराव उर्फ बाबुराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन स्वर्गीय बाबुराव देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आशीर्वाद घेतला.

यावेळी त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, श्रीराम शिक्षण संस्थेचे चेअरमन भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाशबापू पाटील, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिनजी शिंदे, भाजप तालुका संघटक डॉ. निलेश ननवरे, भाजप अकलूज शहराध्यक्ष महादेवरावजी कावळे, अखिल भारतीय जोशी समाज संघटनेचे महाराष्ट्र संघटक डॉ. अक्षय वाईकर, अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक राहुल लोंढे, नगरसेवक महेश शिंदे, नगरसेविका दिपाली वाघमोडे, नगरसेविका जयश्री एकतपुरे, माळी समाजाचे युवा नेते पिंटूशेठ एकतपुरे, मळोली गावचे प्रगतशील बागायतदार बाळबापू जाधव, अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ सेवकांची सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय आसबे सर, आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंगभाऊ देशमुख यांच्या परिवारांच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा इंद्रनील उद्योग समूहाचे सर्वेसर्वा विक्रमभाऊ माने देशमुख यांनी उमेदवार राजेंद्र उर्फ राजाभाऊ यांचा सन्मान केला…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button