माळशिरसच्या हमालाची धमाल थेट नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर केली कमाल.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याकरता वेळप्रसंगी हमाली करणारे रघुनाथ चव्हाण थेट माळशिरस नगर परिषदेचे नगराध्यक्ष बनले….
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक वार्ड क्र. 17 चे रघुनाथ चव्हाण प्रेमळ स्वभावाचा व दिलदार मनाचा व क्षणात नजरेने समोरच्या व्यक्तीला घायाळ करणार असे व्यक्तिमत्व असणारे व वडील पांडुरंग चव्हाण व आई रुक्मिणी चव्हाण यांच्या प्रतिकूल परिस्थितीतून संघर्षमय जीवनातून एक व्यक्तिमत्व उदयाला आलेले व संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याकरता वेळप्रसंगी हमाली करणारे रघुनाथ चव्हाण थेट माळशिरस नगर परिषदेचे नगराध्यक्ष बनले.
माळशिरस नगरपंचायतीमध्ये माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख गटाचे प्रभाग क्र. 17 मधील नगरसेवक रघुनाथ चव्हाण यांनी माळशिरस नगराध्यक्ष पदाच्या रिक्त जागेवर नामनिर्देशन भरलेले आहे. नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आलेला असल्याने दि. 20/05/2026 रोजी औपचारिकता बाकी आहे. नगराध्यक्ष पदाची घोषणा बाकी राहिलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याकरता वेळप्रसंगी हमाली करणारे रघुनाथ चव्हाण थेट माळशिरस नगर परिषदेचे नगराध्यक्ष बनलेले असल्याने माळशिरसच्या हमालाची कमाल थेट नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कमाल आहे.

माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत आप्पासाहेब देशमुख व तुकाराम देशमुख गटामध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी कार्यकाळ ठरलेला आहे. आप्पासाहेब देशमुख गटाच्या प्राजक्ता ओव्हाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदी तुकारामभाऊ देशमुख गटाचे रघुनाथ चव्हाण यांचा एकमेव अर्ज आलेला आहे. 20 तारखेला नगराध्यक्ष पदाची औपचारिक घोषणा बाकी राहिलेली आहे.
रघुनाथ चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय जीवनाला सुरुवात केलेली आहे. आई वडिलांच्या गरिब परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. पाचवीपर्यंत व्यवहार ज्ञानापुरते शिक्षण घेऊन त्यांनी समाजकार्याला सुरुवात केलेली होती. स्वाभिमानी व स्वावलंबी असल्याने त्यांनी वेळप्रसंगी हमालीचा सुद्धा व्यवसाय केला. परंतु, स्वाभिमानाने त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुद्धा सुरुवात केली. पहिल्याच निवडणुकीत त्यांना यश मिळाले आहे.

राजकीय घडामोडीत दोन गट एकत्र येऊन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी ठरल्याप्रमाणे बिनविरोध होत आहेत. रघुनाथ चव्हाण माळशिरस नगरपंचायतीचे बिनविरोध नगराध्यक्ष होणार आहेत. रामोशी समाजामध्ये राजकारणात कमी लोक आहेत. रघुनाथ चव्हाण यांना माळशिरस तालुक्यात नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा रामोशी समाजाचे बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळालेला आहे. तालुक्यातील मित्रपरिवार व नातेवाईक व माळशिरस शहरामधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बिनविरोध नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण यांना भावी राजकीय कारकीर्दीसाठी बारामती झटका परिवार यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



