माणकी गावचे माजी उपसरपंच भारत केरबा धाईंजे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन…

माणकी (बारामती झटका)
माणकी, ता. माळशिरस, गावचे माजी उपसरपंच भारत केरबा धाईंजे उर्फ दादा यांचे वयाच्या 68 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवार दि. 03/06/2026 रोजी पहाटे 05 वाजता दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी नागरबाई भारत धाईंजे, दोन मुले आकाश व गौतम, एक मुलगी वैशाली बाळू सरतापे, भाऊ सुरेश केरबा धाईंजे, बहिण छबाबाई जालिंदर तोरणे, नातू दीपक, आर्यन, निल, आम्रपाली, सानी, समीक्षा, ऋतुजा असा परिवार आहे. त्यांच्यावर आजच माणकी येथे सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे..
कालकथित माजी उपसरपंच भारत केरबा धाईंजे यांना दादा या टोपण नावाने ओळखत होते. दादांचा स्वभाव मनमिळावू होता. ते सर्व जाती-धर्मांमध्ये मिळून मिसळून असत. समाजाच्या कार्यात ते नेहमी अग्रेसर असत.
त्यांच्या दुःखद निधनाने माणकी गावात राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे. संपूर्ण माणकी गाव व पंचक्रोशीवर दुःखद निधनाने शोककळा पसरलेली आहे.

त्यांच्या दुःखद निधनाने धाईंजे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. धाईंजे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व कालकथित माजी उपसरपंच भारत धाईजे उर्फ दादा यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



