ताज्या बातम्याराजकारण

मांडवे गावच्या उपसरपंच पदाच्या निवडीकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिले..

मांडवे (बारामती झटका)

मांडवे ता. माळशिरस, या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पंचशीला रामचंद्र गायकवाड यांनी राजीनामा दिलेल्या रिक्त उपसरपंच पदी कोणाची वर्णी लागणार, याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

मांडवे गावचे उपसरपंच पंचशीला रामचंद्र गायकवाड यांनी दि. 20/10/2023 रोजी राजीनामा दिलेला आहे. रिक्त जागी दि. 17/11/2023 रोजी उपसरपंच पदाची निवड सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. एस. व्ही. जाधव यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे.

मांडवे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी जे चित्र होते, ते चित्र बदललेले आहे. मांडवे गावाला नवीन पूल झालेला आहे. पुलाखालून पाणी बरेच वाहिलेले आहे. तसेच राजकीय पुलाखालून सुद्धा अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. मांडवे गावामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली, त्याचीच पुनरावृत्ती मांडवे ग्रामपंचायतीमध्ये घडत आहे. उपसरपंच पदावर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. उद्या उपसरपंच कोण होतंय, यावर अनेक राजकीय समीकरणे तयार होणार आहेत. निश्चितपणे मांडवे ग्रामस्थांच्या मनामधील उपसरपंच होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. Good blog! I really love how it is simple on my eyes and the data are well written. I am wondering how I could be notified whenever a new post has been made. I have subscribed to your feed which must do the trick! Have a nice day!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button