मांडवे येथील सदाशिव तुकाराम जगदाळे यांचे दुःखद निधन…

भांबुर्डी गावचे उपसरपंच पदावर काम करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा केलेली होती…
मांडवे (बारामती झटका)
मांडवे, ता. माळशिरस येथील सदाशिव तुकाराम जगदाळे यांचे गुरुवार दि. 26/03/2026 रोजी संध्याकाळी 8.05 वाजता वयाच्या 85 व्या वर्षी वार्धक्याने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सावित्रीबाई, ज्ञानदेव, विजय, बाळासो, शहाजी, सुभाष व नंदकुमार अशी सहा मुले तर, केशर साधू रणवरे, मांडकी, कस्तुरा तानाजी जाधव जाधववाडी, सखुबाई सदाशिव सावंत हवलदारवाडी माण तीन मुली, सुना व नातवंडे असा उच्चशिक्षित परिवार आहे.. त्यांच्यावर मांडवे येथे शोकाकुल वातावरण अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. त्यांचा रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शनिवार दि. 28/03/2026 रोजी सकाळी 7.30 वाजता संपन्न झालेला आहे. दशक्रिया विधी दि. 04/04/2026 रोजी सकाळी 09 वाजता संपन्न होणार आहे.
तुकाराम जगदाळे यांना सदाशिव सह सात मुलं व एक बहीण असा मोठा परिवार आहे. मुळगाव जाधववाडी भांबुर्डी आहे. भांबुर्डी गावच्या उपसरपंच पदावर सदाशिव जगदाळे यांनी काम करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा केलेली आहे. भांबुर्डी गावामधून जाधववाडी स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यानंतर जगदाळे परिवार जाधववाडी व मांडवे या गावांमध्ये वास्तव्यास आहेत.
स्वर्गीय सदाशिव तुकाराम जगदाळे यांच्या दुःखद निधनाने भांबुर्डी, जाधववाडी, मांडवे गावावर शोककाळा पसरलेली होती. स्वर्गीय सदाशिव जगदाळे यांच्या दुःखद निधनाने जगदाळे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय सदाशिव जगदाळे यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



